Dilip Kumar Saira Banu Wedding : बॉलिवूड अभिनेता दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची प्रेम कहाणी इंडस्ट्रीमधील चर्चित लव्ह स्टोरीपैकी एक आहे. दिलीप कुमार आता या जगात नसले, तरी सायरा बानो त्यांच्याबद्दलचे किस्से शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत असतात. सायरा बानो यांनी अलिकडेच सांगितलं की, त्यांचं लग्न फार घाईगडबडीत झालं होतं. त्यांचा लेहंगा एका साध्या लोकल टेलरने शिवला होता आणि लग्नपत्रिका देखील छापल्या गेल्या नव्हत्या. दिलीप कुमार यांनी सायरा यांच्या आईला फोन करुन मौलवींना बोलवून निकाह करण्याबद्दल सांगितलं.


दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नातील किस्सा


सायरा बानो यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिलीप कुमार यांच्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत लिहिलं, 'आमचं लग्न जितके सुंदर होते तितकाच त्यावेळी गोंधळही उडाला होता. यात असामान्य काहीच नव्हतं. माझा लग्नाचा लेहेंगा स्थानिक टेलरने शिवला होता. सर्व काही इतक्या लवकर झाल्यामुळे, आमच्याकडे आमच्या लग्नाची पत्रिका छापायलाही वेळ नव्हता.


सुपरस्टारच्या लग्नाचा पोहोचला शेकडोंचा जमाव 


त्यांनी पुढे लिहिलं, 'ही चांगली गोष्ट होती, कारण जर जास्त वेळ असता तर माझी आई, परी चेहरा नसीम बानो यांनी डिझायनर्सपासून सोनारांपर्यंत सर्वांची परेड करत लग्नाची तयारी केली असतली आणि लग्नात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नसती. माझ्या घरी लग्न होत असल्याची माहिती मिळताच शेकडो लोकांचा जमाव माझ्या घरी पोहोचला होता.


घाईगडबडीत पार पडलं लग्न


दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचं लग्न नोव्हेंबरमध्ये होणार होते, पण दिलीप कुमार यांच्यामुळे तिला घाई करावी लागली. सायरा बानो यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'आमचे लग्न आधी नोव्हेंबरमध्ये होणार होते, पण काही कारणांमुळे आम्हाला घाई करावी लागली. दिलीप साहेबांनी कोलकाताहून माझ्या आईला फोन करून मौलवीला बोलावून निकाह पार पाडण्यास सांगितले.


विना आमंत्रित पाहुणे काटे आणि चमचे घेऊन गेले


'दिलीप साहेबांची वरात माझ्या बंगल्यावर पोहोचताच चाहत्यांची मोठी गर्दी झाली. तिथे इतके लोक पोहोचले होते की मला निकाह विधी करण्यासाठी वरच्या मजल्यावरून खाली उतरायला दोन तास लागले. आणि, तुमचा विश्वास बसणार नाही, पण लग्नात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता. कल्पना करा, एका महान अभिनेत्याच्या लग्नात अन्नाची कमतरता होती. सुपरस्टारच्या लग्नाला गेल्याची आठवण राहावी म्हणून निमंत्रित पाहुणे आणि चाहतेही तिथे जे काही सापडेल ते गोळा करत होते. कोणी चमचा तर कोणी काटा घेऊन घरी गेले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


तारक मेहताचा 'टप्पू' लग्नबंधनात अडकणार? अभिनेत्याने 'बबीता जी'सोबतच्या नात्यावर मौन सौडलं