एक्स्प्लोर
आलिया भट्टला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला लखनौमधून अटक
मुंबई: बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट यांना 50 लाखांच्या खंडणीसाठी धमकी देण्याऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव संदीप साहू असं असून त्याला उत्तरप्रदेशमधील लखनौमधून अटक करण्यात आली आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट यांना संदीप साहूनं 50 लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. महेश भट यांनी या संदर्भात जुहू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
फोनवरुन संदीप साहूनं ५० लाख रुपयांची मागणी केली होती. जर, हे पैसे दिले नाही तर मुलगी आलिया भट आणि पत्नी सोनी राजदान यांना मारण्याची धमकी दिल्याची तक्रार महेश भट यांनी दिली होती.
आरोपीनं सुरुवातीला महेश भट्ट यांना फोन केला होता. पण त्याच्या या धमकीकडे महेश भट्ट यांनी फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण त्यानंतर धमकीचे अनेक मेसेज महेश भट्ट यांना पाठवण्यात आले. त्यानंतर मात्र, महेश भट्ट यांनी पोलिसात धाव घेतली
यासंदर्भात महेश भट यांनी ट्विटही केलं होतं, या प्रकरणात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी लक्ष घालावं असं आवाहन त्यांनी केलं होतं.A bolt from the blue in the form of an extortion call & threat to my family was nipped in the bud by the MH & UP police in tandem.Gratitude!
— Mahesh Bhatt (@MaheshNBhatt) March 2, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement