Prithviraj : खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) बहुचर्चित 'पृथ्वीराज' (Prithviraj) सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदीने (Chandraprakash Dwivedi) सांभाळली आहे. ट्रेलर लॉंचच्या सोहळ्यात डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सिनेमाच्या वादावर भाष्य केले आहे.
डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले,"पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित 'पृथ्वीराज' हा सिनेमा आहे. राजा पृथ्वीराज चौहान यांना अनेक नावांनी ओळखले जाते. त्यामुळे सिनेमाचे नाव 'पृथ्वीराज' ठेवल्याने हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या सिनेमाचे नाव सम्रात असावे, अशीही मागणी होत होती".
'पृथ्वीराज' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत असणार आहे. मानुषी छिल्लर या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा सिनेमा 3 जून रोजी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या