Prithviraj : आज (09 मे) सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या पृथ्वीराज (Prithviraj) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. मुंबईमधील यश राज स्टूडिओ येथे या चित्रपटाच्या ट्रेलरचा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अक्षय कुमार (Akshay Kumar) , मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) आणि दिग्दर्शक  डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी हजेरी लावली होती. 


ट्रेलर लाँचच्या वेळी अक्षय कुमार यानं सांगितलं की, 'चित्रपटामध्ये भारताचे महान सुपुत्र सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली याचा अभिमान वाटतो. माझ्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये मला अशा प्रकारच्या भव्य आणि ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली नव्हती. डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदींनी जेव्हा ही महान व्यक्तिरेखा साकारायला सांगितली तेव्हा मला माझे  जीवन सफल झाले आहे, असं वाटलं.'


अक्षयनं सांगितलं की,   डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी त्याला 'पृथ्वीराज रासो' नावाचे पुस्तक वाचण्यासाठी दिले होते, त्यानंतर अक्षयला पृथ्वीराज हे किती महान योद्धा आहेत, याबद्दल अधिक माहिती मिळाली. पुढे अक्षय म्हणाला, 'शाळेमध्ये पृथ्वीराज यांच्याबाबत फार कमी माहिती दिली जाते. पुस्तकामध्ये तर फक्त एक पॅरेग्राफ असतो. त्यामुळे देशामधील प्रत्येक मुलाला आपला इतिहास माहित असावा. त्यामुळे मी देशातील प्रत्येक राज्याच्या सरकारला विनंती करतो की, प्रत्येक शाळांनी हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवणं हे सरकारनं आनिवार्य करावं. त्यामुळे शाळेतील मुलांना आपल्या इतिहासाची माहिती मिळेल.'


ट्रेलर लाँच वेळी अक्षय आईच्या आठवणीत भावूक झाला. तो म्हणाला की, 'माझी आई जर आज जिवंत असली असती तर तिला माझी पृथ्वीराज चित्रपटामधील भूमिका पाहता आली असती. ' या चित्रपटाचं शूटिंग हे केवळ 42 दिवसांमध्ये पूर्ण झालं, असंही अक्षयनं यावेळी सांगितलं. 


संबंधित बातम्या