एक्स्प्लोर
डिम्पी गांगुलीच्या घरी नन्ही परी, नाव ठेवलं...
मुंबई : राहुल महाजन याची घटस्फोटित पत्नी, बिग बॉसच्या आठव्या पर्वातील स्पर्धक डिम्पी गांगुलीच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. डिम्पीने एका गोड मुलीला जन्म दिला आहे.
डिम्पीने आपल्या मुलीचं नाव 'रिहाना' (Reanna) असं ठेवलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने फोटो शेअर करताना ही बातमी सांगितली आहे. डिम्पी गेल्या वर्षी 27 जुलैला बिझनेसमन रोहित रॉयसोबत विवाहबंधनात अडकली होती.
गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन तिने तिचे बेबी बम्प मिरवलेही होते. त्यामुळे तिच्या प्रेग्नन्सीविषयी सर्वत्र चर्चा होती. राहुल महाजन आणि डिम्पी 'राहुल दुल्हनिया ले जाएंगे' या कार्यक्रमानंतर विवाहबंधनात अडकले होते, मात्र सारं काही आलबेल न झाल्यामुळे ते विभक्त झाले. त्यानंतर डिम्पीने रोहितसोबत लग्नगाठ बांधली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
जालना
क्राईम
विश्व
Advertisement