एक्स्प्लोर

दिलीप कुमारांचा बंगला हडपण्यासाठी धमकी, सायरा बानोंचं मोदींना ट्विट

दिलीप कुमार यांचा वांद्र्यातल्या पाली हिल परिसरातील बंगला हडपण्यासाठी धमकी देण्यात येत असल्याची तक्रार सायरा बानो यांनी केली होती. या बंगल्यातील काही जागेची खोटी कागदपत्रे तयार करून समीर भोजवानी ही जागा बळकाविण्यासाठी धमकावत असल्याची तक्रार सायरा बानो यांनी केली होती.

मुंबई : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांनी पंतप्रधान मोदी यांना ट्विट करत मदत मागितली आहे. भू-माफिया समीर भोजवानी हा कारागृहातून बाहेर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतरही काही कारवाई झाली नाही, असं ट्विट सायरा बानो यांनी मोदींना अभिनेते दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन केलं आहे. समीर भोजवानीला पोलिसांनी एप्रिलमध्ये अटक केली होती. दिलीप कुमार यांचा वांद्र्यातल्या पाली हिल परिसरातील बंगला हडपण्यासाठी धमकी देण्यात येत असल्याची तक्रार सायरा बानो यांनी केली होती.  या बंगल्यातील काही जागेची खोटी कागदपत्रे तयार करून समीर भोजवानी ही जागा बळकाविण्यासाठी धमकावत असल्याची तक्रार सायरा बानो यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या तक्रारीची दखल घेतली होती. त्यानंतर भोजवानी याच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. भोजवानी सध्या तुरुंगातून बाहेर आला आहे. याचा दाखला देत सायरा बानो यांनी दिलीपकुमार यांच्या ट्विटर हॅण्डलवरून मोदींना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.  ट्विट करत मुंबईत भेटीसाठी विनंती 'मी सायरा बानो खान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवू इच्छिते की, भूमाफिया समीर भोजवानी हा तुरुंगातून बाहेर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. पद्म पुरस्कार विजेत्याला धनाचा आणि बळाचा वापर करून धमकाविले जात आहे. आपल्याकडे मुंबईत भेटीसाठी विनंती करीत आहे', असे सायरा बानो यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Muntashir On Student Protest: 'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी
4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Embed widget