एक्स्प्लोर

Dilip Kumar Funeral : दिग्गज अभिनेत्याला अखेरचा निरोप; तिरंग्यात लपेटलेल्या दिलीपकुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Dilip Kumar Funeral: दिलीप कुमार यांनी आज सकाळी 7.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.

Dilip Kumar Last Rites: वयाच्या 98 व्या वर्षी जग सोडून जाणारे अभिनेते दिलीपकुमार यांना साश्रू नयनांनी अंतिम निरोप देण्यात आला. तिरंग्यात लपटलेलं दिलीप कुमार यांचं पार्थिव सांताक्रूझ स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. दिलीप कुमार यांना शासकीय इतमामात शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचे कुटुंबच नाही तर उद्योगाशी संबंधित लोकही उपस्थित होते. सायरा बानो शेवटच्या क्षणापर्यंत दिलीपकुमार यांच्या पार्थिवाबरोबर होत्या.

दिलीपकुमार यांनी बुधवारी सकाळी 7.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार यांच्या शेवटच्या प्रवासामध्ये सामान्य लोकही सहभागी झाले होते. यावेळी बरीच गर्दी दिसून आली. प्रत्येकजण आपल्या आवडत्या अभिनेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी रस्त्यावर आला होता.

स्मशानभूमीअगोदर मशिदीत नेण्यात आले
स्मशानभूमीच्या आधी पार्थिव मशिदीत नेण्यात आले. त्यानंतर त्यांचं पार्थिव सांताक्रूझ स्मशानभूमीत नेण्यात आलं. जिथे त्यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात आला.

काही दिवसांपासून रुग्णालयात होते भरती
दिलीपकुमार यांची प्रकृती बर्‍याच दिवसांपासून खालावत होती. मात्र, गेल्या एका महिन्यात त्यांना दोनदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारीही त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, यावेळी त्यांना वाचवण्यात अपयश आले.

बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली 
दिलीपकुमार यांच्या मृत्यूची बातमी समजताच प्रत्येकजण त्यांच्या घरी पोहचत होता. शाहरुख खान, करण जोहर, रणबीर कपूर, जॉनी लीव्हर सारखे स्टार त्यांच्या घरी दिसले. शाहरुख खानचे दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्याशी खास नाते होते. दोघांनीही नेहमी शाहरुख खानला मुलासारखं वागवलं आहे. म्हणून शाहरुख खानला ही बातमी समजताच तो त्वरित त्यांच्या घरी पोहोचला. सायरा बानो यांना भेटून त्यांचे सांत्वन केले.

महत्त्वाच्या बातम्या

Radhika Apte: 'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
Dia Mirzas Diwali Controversy: दिया मिर्झा प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं; VIDEO पोस्ट करण्यास सांगितलं, तरी BMC कडून विलंब का?
दिया मिर्झा प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं; VIDEO पोस्ट करण्यास सांगितलं, तरी BMC कडून विलंब का?
Kanika Kapoor: 'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare Ramayana Movie: 'शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन्...'; आदिनाथ कोठारेनं सांगितला 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचा 'तो' किस्सा
'शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन्...'; आदिनाथ कोठारेनं सांगितला 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचा 'तो' किस्सा

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Embed widget