Pathan Digital Rights : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'पठाण' (Pathan) सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 2023 मध्ये रिलीज होणार असला तरी शाहरुखने या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. दरम्यान 'पठाण'च्या डिजिटल हक्कांची कोट्यवधींत डील झाली आहे. 


शाहरुख 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक करत आहे. या सिनेमात शाहरुख 'ओम शांती ओम' नंतर दुसऱ्यांदा दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 'पठाण'च्या निर्मात्यांनी या सिनेमाच्या हक्कांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमसोबत 200 कोटींचा करार केला आहे.





'पठाण' सिनेमात शाहरुख अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे. दीपिकाशिवाय या सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया, आशुतोष राणा, जॉन अब्राहम आणि सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत. शाहरुख जवळपास तीन वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 


संबंधित बातम्या


Ajay Devgn : 'RRR' अन् 'गंगूबाई काठियावाडी'; काम करूनही अजय देवगणनं हे चित्रपट पाहिले नाहीत, सांगितलं कारण


Gangubai Kathiawadi : आमिरच्या लेकीनं पाहिला गंगूबाई काठियावाडी चित्रपट; वेश्या व्यवसायाबाबत म्हणाली...


Kangana Ranaut : कंगनानं घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट; फोटो शेअर करत म्हणाली...