Ajay Devgn : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) रनवे 24 (Runway 34) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये अजयसोबतच  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे . अजयनं आरआरआर (RRR) आणि  ‘गंगूबाई काठियावाडी’(Gangubai Kathiawadi) या चित्रपटांमध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण या चित्रपटांबाबत अजयनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं.


आरआरआर आणि गंगूबाई काठियावाडी हे चित्रपट न पाहण्यामागील कारण आजयनं सांगितलं तो म्हणाला, 'मला घरी ओटीटीवर चित्रपट पाहायला आवडत नाही.  चित्रपट पाहिल्यानंतर मला वाटतं की मी अजून चांगलं काम करू शकलो असतो. त्यामुळे मी हे चित्रपट पाहिले नाहीत.' गंगूबाई चित्रपटामध्ये अजयनं करीम लाला ही भूमिका साकारली तर आरआरआरमध्ये त्यानं एका कॅरेक्टरच्या वडिलांची भूमिका साकारली. 


मुलाखतीमध्ये अजयनं सांगितलं की त्यानं काजोल आणि शाहरूख यांचा  'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'  हा चित्रपट देखील पाहिला नाही. याबाबत तो म्हणाला, 'मी बरेच चित्रपट पाहिले नाहीत. अनेक वेळा चित्रपट रिलीज झाल्यानंतर मी बिजी होतो. त्यामुळे काही चित्रपट बघणं राहून जातं'. ‘रनवे 34’ हा अजय देवगण दिग्दर्शित आणि निर्मित चित्रपट आहे. या चित्रपटात अजयने  विक्रांत खन्ना यांची भूमिका साकारणार आहे. ‘रनवे 34’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित थ्रिलर चित्रपट आहे.


हेही वाचा :