Gangubai Kathiawadi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली होती. 26 एप्रिल रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. नुकताच हा चित्रपट आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खाननं (Ira Khan) पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर इरानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
पोस्टमध्ये आयरानं लिहिलं, 'तुम्ही एखादी गोष्ट अनुभवलेली असते, त्यामुळे जेव्हा आजूबाजूला सुरु असलेली चुकीची गोष्ट बदलण्याची तीव्र इच्छा होते. या अनुभवाने तुम्हाला अनेक अडथळ्यांवर मात्र करून पुढे जायला शिकवलेले असते. तरीही तुम्ही वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देऊ शकत नाही. ' पुढे ती म्हणाली, 'गंगुबाई ही जिंकली आहे. तिने जे साध्य केले त्याबद्दल तिला खरी कृतज्ञता, अभिमान आणि आनंद वाटला.' आयरानं पोस्टमध्ये एडम प्रोजेक्टचा एक कोट देखील लिहिला आहे.
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. चित्रपटात आलिया भट शांतनु, आलिया, अजय देवगणस विजय राज, सीमा पाहवा यांनी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच समंथा, सोफी चौधरी, अनन्या पांडे, आदित्य सील, अनुराग कश्यप आणि नीतू कपूर या कलाकरांनी कौतुक केलं.
हेही वाचा :
- Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
- Satyavan Savitri : गोष्ट सत्यवान-सावित्रीची, प्रेमावरील विश्वासाची! नवी मालिका ‘सत्यवान सावित्री’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
- Payal Rohtagi : ‘चेहरा सुंदर दिसण्यासाठी सगळेच उपाय सांगतात, पण...’, पायल रोहतगीने व्यक्त केलं ‘त्या’ गोष्टीचं दुःख!