Sussanne Khan, Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि त्याची माझी पत्नी सुझान खान (Sussanne Khan) यांनी मुलगा रिदानचा (Hridaan) 14वा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. यावेळी पापाराझींनी दोघांनाही एकत्र स्पॉट केले होते. यावेळी सुझान खानसोबत तिची दोन मुलं रिदान आणि रिहानही (Hrehaan) दिसले होते. सुझान आणि हृतिकने मुलगा रिदानचा वाढदिवस एकत्र साजरा केला. नुकताच सुझानने इंस्टाग्रामवर हृतिक रोशनसोबतचा एक फॅमिली फोटो शेअर केला आहे.
सुझानने शेअर केलेल्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुमच्यासोबत प्रत्येक दिवस सेलिब्रेट करत आहोत, आम्ही भाग्यवान आहोत. 14व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे.’ या फोटोवर आता सुझान खानचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी (Arslan Goni) याने देखील कमेंट केली आहे. त्याने रिदानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा पोस्ट :
सुझानच्या या फोटोवर सेलेब्स, तसेच नेटिझन्स तिच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सुझानच्या मुलांचे कौतुक करताना एका युजरने लिहिले की, 'दोन्ही मुले देखणी आहेत.' दुसऱ्या एका युजरने लिहिली की, 'वा! काय कुटुंब आहे...हृतिक रोशनसोबत सुझान खान.’ अनेक चाहत्यांनी त्यांना एकत्र पाहून आनंद झाल्याचे म्हटले आहे.
अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची माजी पत्नी सुझान खान यांनी रविवार, 1 मेचा खास दिवस रिदान आणि रिहान यांच्यासोबत घालवला. कुटुंबाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे, ज्यामध्ये सुझान तिच्या कारच्या दिशेने जाताना दिसत आहे, तर हृतिक मुलांसह तिच्या पाठीमागे जाताना दिसत आहे.
हेही वाचा :
Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल