Dharmendra :  बॉलिवूडचे 'हिमॅन' ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra)  हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रीय असतात. चाहत्यांसोबत ते सोशल मीडियामाध्यमातून संवादही साधतात. धर्मेंद्र हे वयाच्या 88 व्या वर्षीही चित्रपटात काम करत आहेत. धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर 64 वर्षांनी मोठा निर्णय घेतला आहे. धर्मेंद्र यांनी आपले ऑनस्क्रीन (Dharmendra Change his Name) नाव बदलले आहे.  धर्मेंद्र हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) या चित्रपटात खास भूमिकेत आहेत. 


अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटा प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात धर्मेंद्र शाहिद कपूरच्या आजोबांच्या भूमिकेत दिसत आहे.'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'च्या माध्यमातून धर्मेंद्र यांनी आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. 


धर्मेंद्र यांचे नवे नाव!


धर्मेंद्र यांनी आपले ऑनस्क्रीन नाव बदलले आहे. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मध्ये धर्मेंद्रला नाही तर अन्य  नावाने श्रेय देण्यात आले आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, गेल्या 64 वर्षांपासून धर्मेंद्र यांच्या नावावरच क्रेडिट दिले जात असे. पण, या चित्रपटात त्याला धर्मेंद्र सिंग देओलच्या नावाने श्रेय देण्यात आले आहे. धर्मेंद्र यांचे नाव धरम सिंह देओल असेच आहे. मात्र, चित्रपटसृष्टीत त्यांनी आपले ऑनस्क्रीन नाव बदलून धर्मेंद्र असे ठेवले.  त्यांनी आपले पूर्ण नाव कधीही वापरले नाही. त्यांनी कायम धर्मेंद्र असेच नाव वापरले. आता  'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटात त्यांनी आपले पूर्ण नाव वापरण्यास सुरुवात केली आहे. यामागचे नेमकं कारण काय, हे अद्यापही समोर आले नाही. 


 






'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मध्ये कृती सेनन एका रोबोटची (सिफ्रा) भूमिका साकारत आहे. आर्यन (शाहिद कपूर) हा तिच्या प्रेमात पडतो. आर्यनने सिफ्राशी लग्न करण्याचा निर्णय घेतो आणि तिची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून देतो. तो त्याच्या कुटुंबाला सिफ्रा रोबोट असल्याबद्दल सांगत नाही आणि इथूनच गोष्टी चुकीच्या होऊ लागतात. एका ट्रेड रिपोर्टनुसार,  'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' ने पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या विकेंडला चित्रपट अधिक कमाई करेल असा अंदाज आहे.