Eagle Box Office Collection Day 1 : थलैवा रजनीकांत लाल सलाम (Lal Salaam) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून रजनीकांत (Rajinikath) यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतने ( Aishwarya Rajinikath) दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे. मात्र, रजनीकांत यांच्या 'लाल सलाम' (Lal Salaam) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. अभिनेता रवी तेजी (Ravi Teja) याची प्रमुख भूमिका असलेला 'ईगल' प्रदर्शित झाला आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर चुरस रंगली आहे.
रवी तेजाच्या चाहत्यांना 'ईगल' या चित्रपटाची मागील काही काळापासून प्रतीक्षा होती. याआधी हा चित्रपट महेश बाबूच्या 'गुंटूर करम'सोबत प्रदर्शित होणार होता पण काही कारणास्तव चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता रजनीकांत यांच्या 'लाल सलाम' या चित्रपटासोबत 'ईगल' प्रदर्शित झाला आहे.
'ईगल'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'ईगल'ने पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत 5.50 कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे हे कलेक्शन रजनीकांत स्टारर 'लाल सलाम' चित्रपटापेक्षा जास्त आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केवळ 4.5 कोटींची कमाई केली आहे.
ईगल फक्त तेलगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. तर, लाल सलाम चित्रपट हा तामिळ, तेलगू,हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. तरीदेखील लाल सलामचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन कमी आहे.
काय आहे 'ईगल'ची कथा?
कार्तिक गट्टामनेनी दिग्दर्शित आणि पीपल मीडिया फॅक्टरीच्या बॅनरखाली बनलेल्या 'ईगल' चित्रपटात रवी तेजा मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय काव्या थापर, अनुपमा परमेश्वरन, विनय राय, नवदीप आणि मधु यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट कॉन्ट्रॅक्ट किलर सहदेव वर्माची (रवि तेजा) कथा आहे. या जगातून अवैध शस्त्रे नष्ट करण्याच्या मोहिमेवर निघतो.
'लाल सलाम' चित्रपट आहे तरी काय?
'लाल सलाम' हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. दिग्दर्शन ऐश्वर्या रजनीकांतने केले आहे. विष्णू विशाल आणि विक्रांत या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. रजनीकांतची महत्त्वाची भूमिका आहे. तर, माजी क्रिकेटपटून कपिल देव हे कॅमिओमध्ये दिसत आहेत.