Dev Anand 100th Birth Anniversary : देव आनंद (Dev Anand) यांची आज 100 वी जयंती आहे. धरमदेव आनंद उर्फ देव आनंद हे हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक होते. 65 वर्षांच्या सिनेप्रवासात त्यांनी 114 सिनेमांत काम केलं आहे. पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार अशा अनेक लोकप्रिय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. पण बॉलिवूडच्या या हँडसम हिरोची प्रेम कहाणी मात्र अधुरीच राहिली आहे.
देव आनंद यांचा अभिनेत्रीवर जडलेला जीव; पण... (Dev Anand Love Story)
देव आनंद (Dev Anand) आणि अभिनेत्री सुरैया (Suraiya) यांच्या लव्हस्टोरीची त्याकाळी खूपच चर्चा झाली होती. 1948 मध्ये 'विद्या' (Vidya) या सिनेमात देव आनंद आणि सुरैया यांनी काम केलं होतं. या सिनेमातील 'किनारे-किनारे' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान देव आनंद यांनी सुरैया यांना समुद्रात बुडण्यापासून वाचवलं होतं. त्यानंतर हळूहळू देव आनंद आणि सुरैया यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
'जीत' (1949) या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान देव आनंद यांनी सुरैया यांना तीन हजार किंमतीची हिऱ्याची अंगठी घालत यांना प्रपोज केलं. सुरैया यांचं देव आनंद यांच्यावर प्रेम असलं तरी अभिनेत्रीच्या आजीला मात्र त्यांचं हे नातं मान्य नव्हतं. सुरैया आणि देव आनंद यांनी पळून जाऊन लग्न करण्याचाही विचार केला होता. पण आजीच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी कठोर पाऊल उचललं. सुरैया मुस्लिम असून देव आनंद हिंदू होते. त्यामुळेच या लग्नासाठी आजीचा विरोध होता.
देव आनंद यांचा सिनेप्रवास जाणून घ्या... (Dev Anand Movies)
देव आनंद यांनी 'गाइड','हरे रामा हरे कृष्णा','देस परदेस','ज्वेल थीफ' आणि 'जॉनी मेरा नाम' अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. अभिनयासह हँडसम हिरो म्हणून ते ओळखले जात. सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधी देव आनंद .यांनी क्लार्कचं काम केलं आहे. त्यांची पहिली कमाई फक्त 85 रुपये होती. नोकरीत मन न रमल्याने त्यांनी सिनेमांत काम करण्याचा निर्णय घेतला. 'हम एक हैं' हा त्यांचा पहिला सिनेमा.
देव आनंद यांनी आपल्या करिअरमध्ये दिलीप कुमार, अशोक कुमार यांच्यापासून मिथून चक्रवर्ती, आमिर खानपर्यंत अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं आहे. पण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी एकही सिनेमा केलेला आहे. 'जंजीर' या सिनेमासाठी बिग बी यांच्याआधी देव आनंद यांना विचारणा झाली होती.
संबंधित बातम्या