मुंबई : सुखविंदर सिंग (Sukhwinder Singh) यांनी यावेळी लतादीदींसोबतच्या आठणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'माझ्या गायनावर सर्वात जास्त प्रभाव हा लतादीदींच्या गायकिचा आहे.' लता मंगेशकर यांचं आणि सुखविंदर यांची एक खूप सुंदर आठवण यावेळी त्यांनी माझा कट्ट्यावर (Majha Katta) सांगितली. तर त्यांनी यावेळी पंडित भीमसेन जोशींच्या गाण्यांसोबत असलेल्या नात्यांचा उलगडा देखील माझा कट्ट्यावर केला. 


लतादीदींसोबतची 'ती' आठवण


'लतादीदी या बरेच महिने माझ्या स्वप्नात येत होत्या. तुम्ही कोणीही त्यांना नवरीच्या वेषात पाहिलं नसेल पण मी त्यांना माझ्या स्वप्नात लतादीदींना त्या वेषात पाहिलं आहे. मी त्यांच्या मागे अगदी लहान मुलासारखा रांगत जायचो. पण तेव्हा कळालं नाही हे सगळं कशामुळे होत आहे. लतादींदींच्या गाण्यामुळे हे सगळं होत होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं. जगामध्ये एकच चंद्र आहे, समुद्र आहे आणि तो लतादीदी आहेत. पण माझं आशीदीदींवरही तितकच प्रेम आहे. जर लतादीदी समुद्र आहेत, तर आशादींदीच्या गाण्यामध्ये नद्यांचं प्रेम आहे', असं सुखविंदर सिंग यांनी म्हटलं. 


कसं आहे पंडित भीमसेन जोशींची गाणी सुखविंदर यांचं नातं? 


पंडित भीमसेन जोशींची गाणी म्हणजे एक अद्भुत पर्वणी आहे. त्यामुळे मी पंडित भीमसेन जोशी यांची गाणी नेहमी ऐकतो. त्यांच्या जागा, लयी ऐकून वाटतं की हे प्रत्येकाला जमायला हवं. त्यामुळे मी पंडित भीमसेन जोशी यांची गाणी नेहमी ऐकतो. 


सुनिधी चौहानसोबतचा कसा होता प्रवास?


'ओमकारा या चित्रपटामधील ओमकारा हे गाणं विशाल भारद्वाज आणि रेखा भारद्वाज यांनी ते ऐकलं. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की याच चित्रपटामध्ये एक गाणं आहे, जे संपूर्ण सुनिधी चौहान यांनी गायलं होतं. त्यावेळी त्यांनी मला सांगितला मला याची सुरुवातीची दहा सेकंद हवी आहेत. पण ती अगदी तणावामध्ये असावीत. त्यानंतर मी ती दहा सेकंद गायली. तर तेव्हा गुलजार यांनी काही शब्द लिहीले जे अगदी चपखल बसले. त्यानंतर ते पूर्ण गाणं मी गायलं आणि तो सुनिधीसोबतचा एक सुंदर प्रवास होता.' 


सुखविंदर यांचं नशा हे गाणं ऐकून सुनिधी चौहान यांना एका कार्यक्रमादरम्यान अश्रू अनावर झाले होते. ते गाणं देखील सुखविंदर यांनी यावेळी माझा कट्टावर सादर केलं. सुखविंगद यांनी रमता जोगी या गाण्याविषयी सांगताना लवकरच ताल -2 लाँच होणार असल्याचं म्हटलं. ज्या गाण्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्या गाण्यांविषयी देखील सुखविंदर यांनी सांगितलं. 


हेही वाचा : 


Majha Katta : 'महाराष्ट्र माझी कर्मभूमी', सुखविंदर सिंग यांनी 'माझा कट्ट्या'वर उलगडला सुरेल प्रवास