Sai Tamhankar : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हाणकरनं (Sai Tamhankar) बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. सईनं 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिमी या हिंदी चित्रपटामध्ये शमा ही भूमिका साकारली. सईच्या या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनेक कलाकारांनी सईच्या अभिनयाचं कौतुक केलं. सईला मिमी या चित्रपटासाठी आयफा हा पुरस्कार देखील मिळाला. तर आता सईला. फिल्मेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सईनं या सोहळ्याला हटके लूकमध्ये हजेरी लावली होती.
मंगळवारी (30 ऑगस्ट) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 67 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 चे (FilmFare Award Winners) आयोजन करण्यात आले होते. यंदाचा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सिद्धार्थ मल्होत्राच्या शेरशाह या चित्रपटाला मिळाला आहे. तर मिमी या चित्रपटासाठी क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सईला मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. गोल्डन आणि ब्लॅक कलरचा स्किन फिट ड्रेस आणि हटके हेअर स्टाईल अशा लूकमध्ये सईनं फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. सईनं फिल्मफेअरच्या ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोला अनेक कलाकारांनी कमेंट करुन सईला शुभेच्छा दिल्या. जितेंद्र जोशी, अमेय वाघ, स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रिया बापट या कलाकांनी सईच्या पोस्टला कमेंट केली आहे.
पाहा सईची पोस्ट:
मिमी या चित्रपटामध्ये सईसोबतच पंकज त्रिपाठी, मनोज पाहवा, सुप्रिया पाठक या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: