Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. नुकताच जॅकलिननं ईडीवर पक्षपाताचा आरोप केला आहे. एका याचिकेत जॅकलीनने म्हटले आहे की, 'इतर सेलिब्रिटींप्रमाणेच नोरा फतेहीनेही सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू घेतल्या होत्या, या प्रकरणात नोरा फतेही आणि इतर सेलिब्रिटींना साक्षीदार करण्यात आले आहे. पण, माझ्यावर आरोपी असल्याचा ठप्पा का?'. जॅकलिनने ईडीला हा प्रश्न विचारला आहे.
काय म्हणाली जॅकलिन?
जॅकलिन फर्नांडिस म्हणाली, "मी एक पीडित आहे, जी सुकेशच्या फसवणुकीची शिकार झाली आहे. सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या भेटवस्तू आणि त्याच्या 'राजकीय शक्ती'च्या प्रभावाखाली माझी फसवणूक झाली आहे, एक महिला म्हणून मी खूप काही सहन केले आहे. 'इतर सेलिब्रिटींप्रमाणेच नोरा फतेहीनेही सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू घेतल्या होत्या, या प्रकरणात नोरा फतेही आणि इतर सेलिब्रिटींना साक्षीदार करण्यात आले आहे. पण, माझ्यावर आरोपी असल्याचा ठप्पा का? नोरा आणि इतर सेलिब्रिटींनी देखील सुकेशकडून महागडे गिफ्ट्स घेतले होते.'
'ईडीने जप्त केलेले हे सर्व पैसे माझ्या मेहनतीने कमावले आहेत. माझ्या एफडीचा चंद्रशेखरशी कोणताही संबंध नाही.' असंही जॅकलिननं सांगितलं आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आणि हा पैसा सुकेशने केलेल्या 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातला होता. जॅकलिनला याची पूर्वकल्पना असताना तिने ही भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असणाऱ्या सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीनं जॅकलिनला काही महागड्या भेटवस्तू दिल्या.
सुकेशनं 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलंय. त्यामधील अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: