एक्स्प्लोर

बिग बी, सलमान, शाहरुखसोबत दीपिका पदुकोण मादाम तुसाँमध्ये दिसणार

जगप्रसिद्ध मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणला स्थान मिळालं आहे. दीपिकाचा मेणाचा पुतळा दिल्लीत आणि लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये बनवण्यात येणार आहे.

लंडन : जगप्रसिद्ध मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणला स्थान मिळालं आहे. दीपिकाचा मेणाचा पुतळा लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये बनवण्यात येणार आहे. भारतासह जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्वांचे मेणाचे पुतळे मादाम तुसाँमध्ये बनवण्यात आले असून आता दीपिकाचाही त्यामध्ये समावेश होणार आहे.

खुद्द दीपिकानेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 2019 पर्यंत दीपिकाच मेणाचा पुतळा लंडनमधील संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. तर दिल्लीतील संग्रहालयातही काही महिन्यांनंतर दीपिकाचा मेणाचा पुतळा तिच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.

मादाम तुसाँमधील कलाकारांनी दीपिकाची लंडनमध्ये पुतळ्यासंदर्भात भेट घेतली. त्यावेळी पुतळा बनवण्यासाठी तिचे माप देखील घेण्यात आले. पुतळ्यासाठी दीपिकाचे विविध प्रकारे 200 वेळा माप घेण्यात आलं, तसेच दीपिकाचे अनेक फोटोही घेण्यात आले.

मादाम तुसाँमध्ये स्थान मिळाल्याने दीपिका खुप आनंदी आहे. यावेळी दीपिकाने म्हटलं की, 'मादास तुसाँच्या एक्सपर्ट टीमला भेटण्याचा अनुभव चांगला होता.' मादाम तुसाँ म्युझियममध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय, करिना कपूर, कतरिना कैफ, सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित, हृतिक रोशन यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे पुतळे आहेत.

दीपिकाने ओम शांती ओम या चित्रपटातून बॉलिवूडमधील तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली होती. पहिल्याचा चित्रपटात तिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडली. सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dhadkan 2 : 26 वर्षांनंतर 'धडकन'चा सिक्वेल येणार? अक्षय कुमार-शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सुनील शेट्टीच्या एन्ट्रीबाबत मोठी अपडेट
26 वर्षांनंतर 'धडकन'चा सिक्वेल येणार? अक्षय कुमार-शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सुनील शेट्टीच्या एन्ट्रीबाबत मोठी अपडेट
Ajinkya Deo on Alka Kubal: 'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
Mahesh Babus Nephew Marriage: महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल
महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल
Kedar Shinde on Kombdi Palali: 'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा
'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
Rohit Pawar Delimitaion: शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया; राष्ट्रवादी (एसपी) पाठिंबा देणार की नाही?
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया; राष्ट्रवादी (एसपी) पाठिंबा देणार की नाही?
Delimitation Bill Update : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation: डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
Embed widget