एक्स्प्लोर

Deepika Padukone Corona Positive : वडिलांनंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणही कोरोना पॉझिटिव्ह

अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याअगोदर तिचे वडील बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याअगोदर तिचे वडील जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रकाश यांना बंगळुरूच्या भगवान महावीर जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश पादुकोण यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं आणि सध्या त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झाल्यास त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

प्रकाश पादुकोण यांनी अलीकडेच कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता आणि लवकरच ते दुसरा डोस घेण्याच्या तयारीत होते. मात्र, दुसरा डोस घेण्यापूर्वीच त्यांना कोरोना झाल्याचं निदर्शनास आलं आणि त्यांना योग्य उपचार मिळावेत याकरिता रुग्णालयात दाखल केलं गेलं.

बॅडमिंटन विश्वात भारताला नाव कमावून देणाऱ्या प्रकाश पादुकोण यांचं वय सध्या 65 वर्ष इतकं आहे. प्रकाश यांनी 1980 साली बॅडमिंटन विश्वात पहिला रॅंक मिळाला होता, ते जगातील सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू ठरले होते. त्याच वर्षी जगातील सर्वात मोठी मानली जाणारी ऑल इंग्लंड ओपन ही टूर्नामेंटही त्यांनी जिंकली. ऑल इंग्लंड ओपन ही स्पर्धा जिंकणारे ते पहिलेच भारतीय होते. इतकंच नाही तर 1978 मध्ये कॅनडा येथे झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेतही त्यांनी सिंगल्स कॅटेगरीत सूवर्णपदक पटकावलं. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये प्रकाश पादुकोण यांच्या कामगिरीची यादी बरीच लांब आहे. 


प्रकाश पादुकोण यांना 1972 साली प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार अर्जुन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर पादुकोण यांना देशाला बॅडमिंटन विश्वास उंच शिखरावर नेण्यासाठी 1982 साली पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं.

 

महत्त्वाच्या बातम्या

Jailer 2 OTT: रजनीकांत यांचा जलवा आता घरबसल्या पाहता येणार; 'जेलर 2'ची OTT रिलीज डेट जाहीर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
रजनीकांत यांचा जलवा आता घरबसल्या पाहता येणार; 'जेलर 2'ची OTT रिलीज डेट जाहीर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
Kareena Kapoor khan on Saif ali khan Attack: 'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
Amruta Khanvilkar: 'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
Dhanush Spotted With Mystery Woman: धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?
धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Embed widget