एक्स्प्लोर

रणवीर-दीपिका इटलीत कोकणी पद्धतीने विवाहबंधनात

रणवीर आणि दीपिका उद्या सिंधी पद्धतीने पुन्हा लगीनगाठ बांधणार आहेत. तर 23 नोव्हेंबरला बंगळुरुमध्ये दोघांच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.

रोम : बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. इटलीतील लेक कोमोच्या काठावर असलेल्या 'विला डेल बालबिअॅनेलो' (villa del balbianello) या निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये 'दीपवीर'चा शाही विवाहसोहळा पार पडला. पारंपरिक कोंकणी पद्धतीने रणवीर आणि दीपिकाचं लग्न झालं. दीपिकाला आवडणाऱ्या वॉटर लिलीच्या फुलांनी लग्नाचा मंडप सजवण्यात आला होता. मंत्रोच्चाराचे आवाज विलाच्या बाहेरही ऐकू येत होते. अद्याप दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आलेले नाहीत. या विवाह सोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रणवीर-दीपिकाचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र असे फक्त 40 जणच या लग्नाला उपस्थित होते. अभिनेता शाहरुख खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी लग्नाला उपस्थित असल्याची माहिती आहे. रणवीरची ग्रँड एन्ट्री लग्नाच्या आदल्या दिवशी संगीत आणि मेहंदी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दीपिका आणि रणवीरनेच पाहुण्यांचं स्वागत केलं. शुभा मुदगल यांच्या गायनाने दीपिका भावुक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले, असं म्हटलं जातं. तर रणवीरने 'तुने मारी एन्ट्रिया' गाण्यावर डान्स करत प्रवेश केला. रणवीरने स्वतः ढोल वाजवत संगीत सोहळ्याची शान वाढवली. रणवीरने गुडघ्यावर बसून दीपिकाचा हात हातात घेतला आणि अंगठी घातली. रणवीर आणि दीपिका उद्या सिंधी पद्धतीने पुन्हा लगीनगाठ बांधणार आहेत. तर 23 नोव्हेंबरला बंगळुरुमध्ये दोघांच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. रणवीर-दीपिका 10 नोव्हेंबरला कुटुंबीयांसह इटलीला रवाना झाले होते. पाच वर्षांची प्रेमकहाणी रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची प्रेम कहाणी संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला : रामलीला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती. सेटवर काम करताना दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही. 'गोलियों की रासलीला - रामलीला', बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशा तीन चित्रपटांमध्ये रणवीर-दीपिकाने एकत्र काम केलं आहे. सुरुवातीला दोघांनीही आपल्या प्रेमसंबंधांविषयी बोलणं टाळलं होतं, तरीही चाहत्यांनी दोघांच्या लग्नाची अटकळ बांधली होतीच. मात्र 21 ऑक्टोबरला थेट लग्नाची पत्रिका शेअर करत रणवीर-दीपिकाने चर्चांवर शिक्कामोर्तब केलं. यापूर्वी, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनीही इटलीतच साता जन्माच्या गाठी बांधल्या होत्या. त्यानंतर बॉलिवूडमधलं आणखी एक कपल याच देशात विवाहबंधनात अडकलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
प्रसिद्ध गायिकेनं नशेत कार भरधाव पळवली; पोलिसांनी अडवून अटक केली, आता थेट कोर्टात...
प्रसिद्ध गायिकेनं नशेत कार भरधाव पळवली; पोलिसांनी अडवून अटक केली, आता थेट कोर्टात...
Bollywood Director Struggle Life Story: सर्वात मोठा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर भस्मासूर बनला 'हा' दिग्गज दिग्दर्शक; अहंकार जागा झाला अन् होतं नव्हतं ते सगळं धुळीस मिळालं
सर्वात मोठा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर भस्मासूर बनला 'हा' दिग्गज दिग्दर्शक; अहंकार जागा झाला अन् होतं नव्हतं ते सगळं धुळीस मिळालं

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget