Ganeshutsav 2022 :  यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गणपती सोहळा ताऱ्यांच्या उपस्थितीने उजळून निघाला, सर्व कलाकार पारंपरिक पोशाखात मुख्यमंत्र्यांच्या मलबार हिल येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. गुरुवारी (8 सप्टेंबर) संध्याकाळी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी वर्षा बंगल्यावर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 11 दिवसांचा गणपती सार्वजनिकरित्या साजरा करण्यात आला. 


प्रसिद्ध कलाकारांनी लावली हजेरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणेशोत्सवाला बॉलिवूड आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता रणवीर सिंग, भूषण कुमार, अभिनेते जॅकी श्रॉफ, लक्ष्मी राय, सुनील शेट्टी, श्रद्धा कपूर, शक्ती कपूर, गोविंदा, सारा अली खान, तमन्ना भाटिया, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, सोनल चौहान, शान आणि इतर अनेकजण तिथे उपस्थित होते. सर्व कलाकारांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले. तसेच सर्वांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला.


पाहा फोटो: 








राज्यभरात जल्लोषात गणपती उत्सव साजरा करण्यात आला 


यंदा राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसारख्या मोठ्या शहरांमधील मंडळांनी मोठे देखावे तयार करुन गणेशोत्सव साजरा केला. आज अनंत चतुर्दशी आहे. आज दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जाईल. राज्यभरात आज दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. साश्रू नयनांनी गणेशभक्त बाप्पाचं विसर्जन करतील. मुंबई, पुण्यामधील बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन होईल. मुंबईमधील लालबाग, परळ तसेच पुण्यातील लक्ष्मी रोड सारख्या भागात आज उत्साहाचं वातावरण बघायला मिळेल. सर्व नागरिक बाप्पाला आज निरोप देतील.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: