Sara Ali Khan And Shubhman Gill : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सारा ही क्रिकेटर शुभमन गिलसोबत (Shubhman Gill) दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून सारा आणि शुभमन हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. गुरुवारी (8 सप्टेंबर) शुभमन गिलचा वाढदिवस होता. शुभमनच्या वाढदिवसानिमित्त खुशप्रीतनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. खुशप्रीत हा शुभमन गिलचा मित्र आहे. या पोस्टमधील 'सारा' या शब्दानं अनेकांचे लक्ष वेधले.
'माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझं आयुष्य तुझ्याशिवाय खूप बोरिंग आहे. देव तुला यश, ज्ञान आणि बहुत 'सारा' प्यार देईल.' ,असं खुशप्रीतनं शुभमन गिलच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
खुशप्रीतच्या पोस्टला नेटकऱ्यांनी मजेशीर पोस्ट केल्या आहेत. कमेंट करत एका नेटकऱ्यानं लिहिलं, 'कॅप्शनमध्ये खूप विचार करुन सारा हा शब्द लिहिला आहे.' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'सारा का सारा प्यार इनको देदो'
पाहा पोस्ट:
साराच्या आधी सचिन तेंडूलकर यांची मुलगी सारा तेंडूलकरसोबत देखील शुभमनचं नाव जोडलं गेलं होतं. तर सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या नात्याची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरु होती. अजून सारा आणि शुभमन यांनी त्यांच्या या व्हायरल व्हिडीओबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
सारा आणि शुभमन हे दोघे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. शुभमन हा क्रिकेटचा सराव करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. तर सारा ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. त्यांच्या नात्याबाबत जाणून घेण्यास त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
साराचा 'गॅसलाइट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या आतरंगी रे, लव आज कल,सिम्बा, केदारनाथ या साराच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: