Rahul Vaidya Buys Luxury House in Mumbai : इंडियन आयडल फेम प्रसिद्ध मराठी गायकाने मुंबईत आलिशान घर विकत घेतलं आहे. रिॲलिटी शोमध्ये दिसलेला गायक राहुल वैद्य याने मुंबईतील वांद्रेमध्ये आलिशान घर विकत घेतलं आहे. स्केयर यार्ड्सच्या रिपोर्टनुसार, राहुल वैद्यने अलिकडे मुंबईतील वांद्रेमधील उच्चभ्रू वस्तीत आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. राहुल वैद्यने खरेदी केलेला फ्लॅट डीएलएच सिग्नेचरमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. वांद्रे पश्चिममधील डीएलएच ग्रुपच्या एका प्रिमियम प्रोजेक्टमध्ये राहुल वैद्यने गुंतवणूक केल्याची माहिती आहे.


प्रसिद्ध मराठी गायकाने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर


गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) सध्या यशाच्या शिखरावर आहेत. स्क्वेअर यार्ड्सनुसार, राहुल वैद्यने खरेदी केलेलं अपार्टमेंट अंदाजे 3,110 स्क्वेअर फूट  (288.92 स्क्वेअर मीटर) कार्पेट एरिया आणि 317.93 स्क्वेअर मीटर (3,422 स्क्वेअर फूट) एरियामध्ये पसरलेलं आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये या मालमत्तेचा फायनल व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती आहे. या आलिशान अपार्टमेंटसाठी राहुल वैद्यने 56.37 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क दिल्याची माहिती आहे.


वांद्रेमध्ये कोट्यवधींच्या घराची किंमत माहितीय?


इंडियन आयडॉल सीझन 1 रनर अप राहुल वैद्य याने अलीकडेच मुंबईत 9 कोटी रुपये किमतीची आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे. मालमत्ता सल्लागार कंपनी स्क्वेअर यार्ड्सने बुधवारी एका निवेदनात म्हटलं की, राहुल वैद्यने नुकतेच मुंबईत 9 कोटी रुपयांचे अपार्टमेंट खरेदी केलं आहे. स्क्वेअर यार्डच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. डीएलएच सिग्नेचर प्रिमियम प्रोजेक्ट 1.25 एकरमध्ये पसरलेल्या हा पसरलेला आहे. यामध्ये राहुल वैद्यने कोट्यवधीची मालमत्ता खरेदी केली आहे.







महत्त्वाच्या इतर बातम्या :


रश्मिका-समंथा आधी साऊथ सिनेमातील दिग्गज सेलिब्रिटी, योगा इंस्ट्रक्टर ते अभिनेत्री; जाणून घ्या अनुष्का शेट्टीचं मूळ नाव काय?