Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 7: दिवाळीच्या निमित्तानं बॉलिवूड फॅन्सना मनोरंजनाचा फराळ देण्यात आला. दिवाळीच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. एक रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' आणि दुसरा कार्तिक आर्यन अभिनित 'भूल भुलैया 3'. दोन्ही चित्रपटंची बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर झाली. विकेंडच्या दिवशी दोन्ही चित्रपटांनी मोठा गल्ला जमवला. पण विकडेजमध्ये कमाईत काहीशी घट पाहायला मिळाली. पण, अशातही मल्टीस्टारर 'सिंघम अगेन'ला कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3'नं मागे टाकत आपली घौडदौड सुरूच ठेवली आहे. 'भूल भुलैया 3' मध्ये रूह बाबा म्हणून कार्तिक आर्यननं आपलं वर्चस्व गाजवलं. तर कार्तिकला एक नाही, दोन मंजुलिकांनी दमदार साथ दिली. लोकांना हा चित्रपट इतका आवडला की, अजय देवगनच्या बिग बजेट आणि मल्टीस्टारर 'सिंघम अगेन'शी संघर्ष असूनही, चित्रपटानं आपल्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. 


भूल भुलैया 3 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन 


मंजुलिकानं पुन्हा एकदा आपल्या काळ्या जादूनं बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. यासोबतच 'भूल भुलैया 3' चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. कॉमेडीसोबतच हॉररचा टच असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. कार्तिक आर्यनपासून ते विद्या बालनपर्यंत, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांनीही या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता 'भूल भुलैया 3' रिलीज होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे आणि यादरम्यान चित्रपटानं 7 दिवसांत चांगली कमाई केली आहे.



  • 'भूल भुलैया 3' नं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 37 कोटींची कमाई केली होती.

  • या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 37 कोटींचा गल्ला जमवला.

  • तिसऱ्या दिवशी 'भूल भुलैया 3' नं 33.5 कोटींचा गल्ला जमवलाय.

  • चित्रपटानं चौथ्या दिवशी 18 कोटींची कमाई केली आहे.

  • 'भूल भुलैया 3' नं पाचव्या दिवशी 14 कोटींची कमाई केली आहे.

  • सहाव्या दिवशी चित्रपटाचं कलेक्शन 10.75 कोटी रुपये होतं.

  • Saknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'भूल भुलैया 3' नं रिलीजच्या सातव्या दिवशी 9.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

  • यासह, 'भूल भुलैया 3'चे एकूण 7 दिवसांचे कलेक्शन आता 158.25 कोटी रुपये झालं आहे.


'भूल भुलैया 3'चं भांडवल एका आठवड्यात वसूल 


'भूल भुलैया 3'चा बॉक्स ऑफिसवर एक आठवड्याचा परफॉर्मन्स चांगलाच राहिला आहे. चित्रपटानं 158 कोटींचा टप्पा पार केला आहे. यासह चित्रपटानं त्याचं भांडवल (150 कोटी) देखील वसूल केलं आहे. आता ते 200 कोटींचा आकडा गाठण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता 'भूल भुलैया 3' दुसऱ्या विकेंडला कमाईत वाढ करून हा टप्पा पार करेल असं दिसतंय.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?