एक्स्प्लोर

माझ्या बॉयफ्रेण्डला 'तिच्या'सोबत रंगेहाथ पकडलं होतं : दीपिका

दीपिका-रणबीर पॅचअप करणार असल्याच्या चर्चा रंगत असताना दीपिकाने दिलेली एक मुलाखत या मीडिया रिपोर्ट्सना सणसणीत उत्तर ठरत आहे.

मुंबई : बॉलिवूडचं हिट आणि हॉट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग येत्या नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याचवेळी दीपिका आणि एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूर यांच्या गुप्त भेटी होत असल्याचंही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. दीपिका-रणबीर पॅचअप करणार असल्याच्या चर्चा रंगत असताना दीपिकाने दिलेली एक मुलाखत या मीडिया रिपोर्ट्सना सणसणीत उत्तर ठरत आहे. साधारण 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांची भेट झाली होती. 2008 साली 'बचना ऐ हसिनो'च्या सेटवर दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला. मात्र एके दिवशी दीपिकाने बॉयफ्रेण्डला एका तरुणीसोबत रंगेहाथ पकडलं आणि नात्याची घडी विस्कटली. ब्रेकअपनंतर काही महिन्यांनी एका आघाडीच्या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. रणबीरचं नाव घेणं दीपिकाने टाळलं असलं, तरी हे ओपन सिक्रेट आहे. 'माझ्यासाठी सेक्स म्हणजे केवळ दोन शरीरांचं मीलन नाही. त्यामध्ये भावनाही गुंतलेल्या असतात. रिलेशनशीपमध्ये असताना मी कधीही कोणाची फसवणूक केली नाही. जर मला चीट करायचं असेल, तर रिलेशनशीपमध्ये कशाला अडकावं? त्यापेक्षा सिंगल राहून मजा करावी. पण प्रत्येक जण हा विचार करत नाही. म्हणूनच कदाचित मी जास्त दुखावले गेले. त्याने गयावया केली, तेव्हा त्याला दुसरी संधी देण्याचा मूर्खपणा मी केला. माझे मित्र मला सांगत होते, की तू तुला फसवतोय. पण एके दिवशी मी त्याला रंगेहाथ पकडलं. मला यातून बाहेर पडायला वेळ लागला. परतीचे मार्ग बंद होते.' असं दीपिका म्हणाली होती. 'त्याने पहिल्यांदा मला फसवलं, तेव्हा मला वाटलं होतं की आमच्या नात्यात किंबहुना माझंच काहीतरी चुकतंय. पण त्याला याची सवय जडली, तसं मला समजलं की त्याचाच दोष आहे. मी आमच्या नात्याला खूप काही दिलं, आणि विशेष म्हणजे मोबदल्यात कसलीच अपेक्षा केली नाही. पण व्यभिचाराने हे नातं तोडलं. एकदा नात्यात फसवाफसवी आली, की नात्याचे आधारस्तंभ असलेले आदर, विश्वास निघून जातात.' असंही दीपिकाने सांगितलं होतं. 'ब्रेकअप माझ्यासाठी कठीण होतं. एखाद्या गोष्टीशी किंवा व्यक्तीशी जास्त अटॅच होऊ नये, याची मला जाणीव झाली. मी ब्रेकअपनंतर खूप रडले. पण व्यक्ती म्हणून माझा विकास झाला, त्याबद्दल त्याचे आभारच मानायला हवे' असं दीपिका म्हणते. एकूणच दीपिका रणबीरसोबत पुन्हा पॅचअप करण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. दीपिकासोबत ब्रेकअपनंतर रणबीर आणि कतरिना कैफ यांचं सूत जुळलं. मात्र काही महिन्यातच दोघांनीही एकमेकांना अलविदा केला. सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट डेट करत आहेत. तर दीपिका आणि रणवीर सिंग सध्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: 'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
Sayaji Shinde On Emotional Memory With Ajit Pawar: 'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
Embed widget