Deepika Padukone Daughter Photo : बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. फिल्म इंडस्ट्रीतील क्यूट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा झाले आहे. त्याच्या आयुष्यात गोड परीचं आगमन झालं आहे. 8 सप्टेंबरली दीपिकानं गोंडस चिमुकलीली जन्म दिला आहे. या गोड बातमीमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर नेटकरी दीप-वीरला शुभेच्छा देताना दिसत आहेत. आता चाहते दीपिकाच्या लेकीची झलक पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. अशात आता दीपिकाच्या लेकीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


दीपिका-रणवीरच्या लेकीचा फोटो व्हायरल


दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचं यांचं चाहते सोशल मीडियावर अभिनंदन करताना दिसत आहे. त्यादरम्यान, आता दीपिका पदुकोणचा हॉस्पिटलमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या फोटोमध्ये दीपिकाने आपल्या मुलीला आपल्या कुशीत घेतल्याचं दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.


लेकीसोबत दीपिकाच्या व्हायरल फोटोमागचं सत्य काय?


दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी त्यांच्या बाळाच्या जन्माची घोषणा करताच, चाहत्यांना चिमुकलीची एक झलक पाहण्यासाठी उत्सुकता लागली. त्यानंतर दीपिकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दीपिका हॉस्पिटलच्या बेडवर पडून आहे आणि आपल्या बाळाला हातात पकडलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा फोटो खरा असल्याचं मानत शुभेच्छा दिल्या आहेत, पण व्हायरल होणारे फोटो बनावट आणि एआय-जनरेट केलेले आहेत. दीपिका-रणवीरच्या मुलीचा फोटो अद्याप समोर आलेला नाही.






 






दीपिका-रणवीरने शेअर केली गोड बातमी


दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या मुलीच्या जन्माची घोषणा एका खास पद्धतीने केली होती. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये लिहिले, "वेलकम बेबी गर्ल ,8.9.2024, दीपिका आणि रणवीर". या गोड बातमीनंतर चाहत्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला. आलिया भट्टपासून प्रियंका चोप्रा, कतरिना कैफपर्यंत सर्वांनी या गोड बातमीबद्द्ल शुभेच्छा दिल्या. शाहीन भट्ट, रुबिना दिलीक, अमृता खानविलकर, अर्जून कपूर, श्रद्धा कपूर, परिणीती चोप्रा, अथिया शेट्टी, मलायका अरोरा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी त्याचं अभिनंदन केलं.


लग्नाच्या सहा वर्षांनंतर दिली गूड न्यूज


दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी लग्नाच्या सहा वर्षांनंतर गोड बातमी दिली. दीपिका आणि रणवीर यांनी जवळपास सात वर्षे डेट केल्यानंतर नोव्हेंबर 2018 रोजी इटलीमध्ये थाटात लग्न केलं. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, त्यांनी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे दीपिकाच्या प्रेग्नेन्सीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर या जोडप्याला कन्यारत्न झालं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Deep-Veer Baby Name : दीपिका-रणवीरच्या चाहत्यांनी सुचवलं बाळाचं नाव, दोघांच्या नावातील अक्षर जुळवून म्हणाले...