Deepika Padukone Ranveer Singh Baby Boy Rumors : बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) प्रेग्नेंट असून कल्कि 2898 एडी (Kalki 2898 AD) चित्रपटाच्या यशानंतर सध्या ती प्रेग्नंसी एन्जॉय करताना दिसत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone)आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. दीपिका आणि रणवीरचे चाहतेही त्यांच्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच दीप-वीर आई-बाबा होणार आहेत. दरम्यान, नुकतेच काही फोटो समोर आले आहेत, ज्यावरुन दीपिकाला मुलग होईल, असा दावा करण्यात येत आहे.


दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहला मुलगा होणार? 


सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यावरुन दीपिका आणि रणवीरला मुलगा होणार असल्याचं चाहते बोलत आहेत. भेटवस्तू देणाऱ्या कंपनीने काही भेटवस्तूंचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्यांनी लिहीलं आहे की, हे दीपिकाने ऑर्डर केलेली भेटवस्तू आहे. या फोटोमध्ये भेट वस्तू अतिशय सुंदरपणे पॅक केलेली दिसत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दीपिका पदुकोणलाही टॅग केलं आहे. 


फोटोमुळे नेटकऱ्यांकडून चर्चांना उधाण 


सोशल मिडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर (Reddit) कपड्यांच्या ब्रँडच्या गिफ्टचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमधील गिफ्ट पॅकिंगसाठी निळ्या रंगाच्या सेरामिक्सचा वापर करण्यात आला आहे. यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. या फोटोंवरुन नेटकऱ्यांनी दीपिकाला मुलगा होणार असल्याचे तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या अफवा असून फोटोमुळे या चर्चा होताना दिसत आहेत.


व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण





रेडिटवर यूजरने लिहिलं आहे, मी कुठेतरी वाचलं की, दीपिका पादुकोणला मुलगा होऊ शकतो, मी एका ब्रँड पेजवर पाहिले आणि त्याचा स्क्रीनशॉट घेतला. हे देखील शक्य आहे की, ही फक्त पॅकेजिंगची एक पद्धत आहे आणि या निळ्या रंगाशी कोणताही विशेष संबंध नाही. दरम्यान,  निळा रंग हा मुलाशी संबंधित आणि गुलाबी रंग हा मुलीशी संबंधित असा समज आहे, त्यामुळे यावरुन आता तर्कवितर्क लावले जात आहेत.






दीपिका पदुकोणची डिनर डेट


यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह मुलगा होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, दीपिका पदुकोण गुरुवारी ​​रात्री डिनरवर दिसली होती. मात्र, रणवीर सिंह यावेळी तिच्यासोबत नव्हता. यावेळी दीपिकाचा बेबी बंप दिसत होता. ती हिरव्या रंगाच्या मॅटर्निटी वेअरमध्ये फार सुंदर दिसत होती.