बॉक्स ऑफिसवरच नाही तर गुगलच्या ट्रेंडमध्येही 'तानाजी' 'छपाक'च्या वरचढ
एबीपी माझा, वेब टीम | 15 Jan 2020 11:30 PM (IST)
प्रदर्शनापूर्वीच दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफीसवर जोरदार चर्चा सुरू होती. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत छपाक 'तानाजी' पेक्षा खूप मागे राहिला.
मुंबई : गेल्या शुक्रवारी दीपिका पादुकोणचा 'छपाक' आणि अजय देवगणचा 'तानाजी : द अनसंग वॉरियर' मोठ्या पडद्यावर एकत्र आला. प्रदर्शनापूर्वीच दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफीसवर जोरदार चर्चा सुरू होती. पण बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत छपाक 'तानाजी' पेक्षा खूप मागे राहिला. पण दीपिकाचा छपाक कमाईच्या बाबतीत नाही तर गुगल ट्रेंडमध्येही मागे राहिला आहे. मंगळवारी अजय देवगण, सैफ अली खान आणि काजल स्टारर फिल्म तानाजी या चित्रपटाने 15.28 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाने शुक्रवारी 15.10 कोटी, शनिवारी 20.57 कोटी, रविवारी 26.26 कोटी आणि सोमवारी 13.75 कोटींची कमाई केली. अशा प्रकारे या चित्रपटाने पाच दिवसांत 90.96 कोटींचा व्यवसाय केला आहे. दीपिका पादुकोण आणि विक्रांत मेसी यांची स्टार कास्ट असणारा मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ठरला नाही. पाचव्या दिवशी चित्रपटाने 2 कोटींची कमाई केली. छपाकने शुक्रवारी 4.77 कोटी, शनिवारी 6.90 कोटी, रविवारी 7.35 कोटी आणि सोमवारी 2.35 कोटी कमाई केली. चित्रपटाने पाच दिवसांत एकूण 23.37 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.