बॉलिवूड सेलिब्रिटीमुळे तुमच्या प्रचाराला 'दिशा' मिळेल? आदित्य ठाकरे म्हणाले...
उमेदवारी जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडला. निवडणुकीच्या प्रचारात अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळतात. याच संदर्भात आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला
Continues below advertisement
मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. सेलिब्रिटींनी एखाद्या उमेदवाराचा प्रचार करणं ही बाब आता नवी नाही. परंतु तुमच्या प्रचारालाचा खास बॉलिवूड सेलिब्रिटी येणार का? या प्रश्नावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे काहीसे लाजले. कारण हा प्रश्न अप्रत्यक्षरित्या दिशा पाटनीसंदर्भात होता.
उमेदवारी जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडला. निवडणुकीच्या प्रचारात अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळतात. याच संदर्भात आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला की, "बॉलिवूड सेलिब्रिटी तुमच्या प्रचाराला येणार आहे का, ज्याच्यामुळे तुमच्या प्रचाराला वेगळी 'दिशा' मिळेल? यावर आदित्य ठाकरे काहीसे लाजले आणि आमचा सेलिब्रिटी हा शिवसैनिक असतो," असं उत्तर देत या प्रश्नाला हसतहसत बगल दिली.
खरंतर काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पाटनी एकत्र दिसले होते. डिनर किंवा लंचसाठी गेलेले हे दोघे अनेकदा कॅमेऱ्यातही कैद झाले होते. त्यामुळे दोघांमध्ये नक्की काय चाललंय असा प्रश्नही विचारला जात होता. योगायोग म्हणजे दोघांचा वाढदिवसही एकाच दिवशी येतो. या दोघांची मैत्री पाहता प्रचाराला दिशा पाटनी येणार की नाही असा अप्रत्यक्ष प्रश्न विचारण्यात आल्या. त्यावर आदित्य ठाकरेंनी थेट उत्तर देणं टाळलं.
संबंधित बातम्या
- आदित्य ठाकरेंसोबतच्या डिनर डेटबाबत दिशा पाटनी म्हणते...
- दिशा पटानीबद्दलच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी हात जोडले
- डिनर डेटवर गेलेल्या आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा वाढदिवसही एकाच दिवशी!
Continues below advertisement