मुंबई : युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  गेल्या काही वर्षांपासून दिशा पाटनी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या प्रेमसंबंधांची जोरदार चर्चा सुरु होती. पण आता या दोघांनी ब्रेकअप झाल्याचं वृत्त एका इंग्रजी वेबसाईटने प्रसिद्ध केले आहे.


इंग्रजी वेबसाईटच्या वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीच्या नात्यामध्ये अनेक कठीण प्रसंग आले होते. म्हणून त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. काही आठवड्यांपूर्वीचं दोघांनी स्वसंमतीने वेगळ होण्याचा निर्णय घेतला आहे.

टाइगर आणि दिशा नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकदा एकत्र दिसून आले. परंतु या दोघांनी आपले प्रेमसंबंधाचे नाते कधीच स्वीकारले नाही.  'एम एस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी','बागी 2', ‘भारत’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये दिशा पाटनीने प्रमुख भूमिका बजावल्या आहेत.

काहीदिवसांपूर्वीच दिशा पटानी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंसोबत डीनर डेटसाठी जुहूमधील एका हॉटेलच्या बाहेर दिसून आले होते. त्यांचा फोटो सोशल मिडीयात चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांची खूप चर्चा झाली होती. त्यामुळे आता दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपमागे आदित्य ठाकरे तर कारणीभूत नाही ना? अशी चर्चा बॉलिवूडविश्वात रंगू लागली आहे.