एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
दीपिका-रणवीर पुढील वर्षाच्या सुरुवातीला लग्नबंधनात?
![दीपिका-रणवीर पुढील वर्षाच्या सुरुवातीला लग्नबंधनात? Deepika And Ranveer Are Tying The Knot Early Next Year दीपिका-रणवीर पुढील वर्षाच्या सुरुवातीला लग्नबंधनात?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/02/15090603/ranveer-deepika-padukone-marriage-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडचं कपल पुढील वर्षाच्या सुरुवातीला लग्नबंधनात अडकण्याची चिन्हं आहेत. 'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार दीपिका-रणवीरने त्यांच्या नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही परिवारांत लग्नाची बोलणी झाली असून सर्व तयारीला लागल्याचंही म्हटलं जात आहे. इतकंच काय तर दोघांचा रोक्का (पंजाबी पद्धतीचा साखरपुडा) झाल्याच्याही चर्चा आहेत.
रणवीर-दीपिका त्यांच्या कुटुंबीयांसोबत सध्या ऑस्ट्रियामध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी गेले आहेत. ते 18 जुलैला भारतात परतणार आहेत.
रणवीर आपल्या प्रेमाबाबत खुलेआमपणे बोलतो, तर दीपिका मात्र चारचौघात आपलं व्यक्त करताना फारशी दिसत नाही.
दीपिकाने नुकतंच तिचा हॉलिवूड पदार्पण असलेल्या XXX : झँडर केज सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तर रणवीर फ्रान्समध्ये आदित्य चोप्राच्या बेफिक्रे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)