Shane Warne Passes Away : महान फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) यांचे आज आकस्मित निधन झालं आहे.  शेन वॉर्न यांचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शेन वॉर्न ऑस्ट्रेलियाचे खेळाडू असले तरी भारतातील त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. शेन वॉर्नच्या निधनानंतर बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील शोक व्यक्त करत आहेत. 


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) शेन वॉर्नसोबतचे तिचे खास फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिले आहे,"महापुरुष नेहमी जिवंत राहतात".





बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरनेदेखील (Arjun Kapoor) शेन बॉर्नचा फोटो शेअर करत शोक व्यक्त केला आहे.





सनी देओल (Sunny Deol) शेन वॉर्नचा चाहता आहे. सनी देओलने शेन वॉर्नचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे,"क्रिकेटविश्वाने आपला एक स्टार गमावला आहे".






बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) शेन वॉर्नचा एक फोटो शेअर केला आहे.





उर्मिला मातोंडकरनेही (Urmila Matondkar) शेन वॉर्नचा फोटो शेअर करत त्याच्या मृत्यूच्या वृत्तावर आश्चर्य व्यक्त केले आहे.


संबंधित बातम्या


Institute of Pavtology : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सयाजी शिंदेंच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची' झाली निवड


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Rudra: The Edge Of Darkness : अजय देवगणचा किलर लूक प्रेक्षकांना भावला, 'रुद्रा' वेबसीरिज प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha