Gulabbai Sangamnerkar : मूळच्या संगमनेरच्या असलेल्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर (Gulabbai Sangamnerkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. 


भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या अतिशय मोजक्या लावण्यांपैकी 'राजसा जवळी जरा बसा' या लावणीवर गुलाब बाई संगमनेर यांनी अदाकारी करावी अशी इच्छा खुद्द लता दीदींनी व्यक्त केली होती. गुलाबबाईंनीही लतादीदींचा शब्द प्रमाण मानून या लावणीवर तितकीच दर्जेदार अदाकारी केली होती. 


सुप्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या संगीत दिग्दर्शनात गुलाबबाई संगमनेरकर यांनी गायलेल्या अनेक लावण्या त्याकाळी आकाशवाणीवरील कामगार सभेत प्रसारित व्हायच्या. त्यांचा दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या 'विठाबाई नारायणगावकर' या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. 


लावणी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व, महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगाकर जीवनगौरव पुरस्कार विजेत्या व आपली जन्मभूमी संगमनेरचे नावं आयुष्यभर अभिमानाने मिरवणारी ज्येष्ठ कलावंती 'गुलाबमावशी संगमनेरकर' अशी गुलाबबाई संगमनेरकर यांची ओळख आहे. 


गुलाबबाई संगमनेरकर यांच्याविषयी जाणून घ्या...


गुलाबबाई संगमनेरकर या महाराष्ट्रातील लोकप्रिय कलावंत आहे. बैठकीच्या लावणीसाठी गुलाबबाई संगमनेरकर ओळखल्या जायच्या. गुलाबबाई संगमनेरकर यांना आयुष्यभर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच 'रज्जो' या सिनेमातदेखील त्यांनी काम केलं आहे. गुलाबबाई यांनी फडाच्या तमाशातही काम केलं आहे.


गुलाबबाई संगमनेरकर यांच्या अनेक कला ठासून भरलेल्या होत्या. त्या सर्वगुणीसंपन्न कलाकार होत्या. गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन झाले असले तरी त्यांनी लावणीचा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी मागे ठेवला आहे. 


संबंधित बातम्या


National Cinema Day : 16 सप्टेंबर नाही तर 'या' दिवशी साजरा होणार 'राष्ट्रीय चित्रपट दिवस'; 75 रुपयांमध्ये पाहा चित्रपट


Vaishali Samant : गायिका वैशाली सामंत यांचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, ‘सांग ना’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला!