Tejasswi Prakash : टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सध्या सातत्याने चर्चेत असते. मग त्या चर्चा तिच्या कामाबद्दल असो किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल. ती नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. तेजस्वी तिच्या अप्रतिम सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. छोट्या पडद्यावरुन आपल्या भेटीला येणारी तेजस्वी लवकरच मराठी रुपेरी पडदयावर आपला जलवा दाखवणार आहे. नुकताच आगामी ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटातील तेजस्वीचा ‘फर्स्ट लूक’ रिलीज झाला आहे. यातून तिचा बबली आणि रॉकिंग अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘श्रुती’ असं तिच्या चित्रपटातील भूमिकेचं नाव आहे. नितीन केणी यांच्या ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ’ची प्रस्तुती असलेला हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.


या व्हिडीओमधील तिचा चुलबुला आणि रॉकिंग अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या चित्रपटात तेजस्वी सोबत अभिनेता अभिनय बेर्डे झळकणार आहे. या दोघांची ‘लव्हेबल केमिस्ट्री’ आपल्या चाहत्यांची मने जिंकायला सज्ज झाली आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे.


तेजस्वीनं सोशल मीडियावर तिच्या मन कस्तुरी रे चित्रपटातील लूक शेअर केला आहे, 'ती...पहाटे पडलेलं गोड स्वप्न. ती...सांजवेळी बहरलेल्या मोगऱ्याचा सुगंध. तिच्या सोबतीचे क्षण हवेहवेसे. तिला पाहता मन कस्तुरी रे! मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय एक गोड हसरा चेहरा ... 'श्रुती' च्या भूमिकेत.. तेजस्वी प्रकाश' असं कॅप्शन तेजस्वीनं तिच्या पोस्टला दिलं आहे. 


पाहा तेजस्वी प्रकाशचा लूक: 






इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट आर्टस प्रोड्क्शन, वेंकट अत्तीली आणि मृत्युंजय किचंबरे यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. निशिता केणी आणि करण कोंडे यांच्या ड्रगन वॉटर फिल्म्सने या चित्रपटाची सहनिर्मीती केली आहे. तर ‘यूएफओ सिने मिडिया नेटवर्क’ या चित्रपटाचे वितरक पार्टनर आहेत. व्यवसायप्रमुख शौमिल शहा आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 


Vaishali Samant : गायिका वैशाली सामंत यांचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, ‘सांग ना’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला!