Hariom :  महाराष्ट्राचे आराध्यदैवत, आदरस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे उमरठचे दोन वीर बंधू मावळे  सिंह तान्हाजी आणि सूर्याजी यांच्या बंधूप्रेम व शिवप्रेमाला प्रेरित झालेल्या दोन भावंडांची  कथा मांडणारा 'हरिओम' (Hariom) हा चित्रपट लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 


'हरिओम' या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित  झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली होती. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. मर्दानी छातीचे, कर्तव्यदक्ष मावळे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आदरस्थान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूल्यांवर आणि त्यांच्या मावळांच्या निष्ठेवर आधारलेला सिनेमा  म्हणजे 'हरी ओम'  असा एकंदर चित्र दिसत आहे. हरिओम घाडगे  यांनी एक कलाकार आणि निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. 


नुकताच 'हरी ओम' चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे. भगवा झेंडा, डोळे दिपतील अशी महाराजांची झलक आणि पिळदार शरीरयष्टी, सळसळत्या रक्ताचे, निधड्या छातीचे दोन भाऊ म्हणजेच  नव्या युगातील मावळे हरी आणि ओम आपल्याला या मोशन पोस्टर मध्ये दिसले. हरिओम घाडगे आणि गौरव कदम , सलोनी सातपुते, तनुजा शिंदे प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. 


सर्व प्रेक्षक वर्ग ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ते म्हणजे  या चित्रपटाची तारीख घोषित झालेली आहे. श्री हरी स्टुडिओस निर्मित, आशिष नेवाळकर आणि  मनोज येरुणकर  लिखित आणि दिग्दर्शित 'हरी-ओम' हा चित्रपट 14  ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. 


नव्या पिढीला शिवबांच्या  विचारधारेने प्रेरित झालेल्या हरी आणि ओम या आजच्या  युगातील मावळ्यांची आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला एकतेचे संदेश देणारा चित्रपट 'हरिओम' येतोय 14 ऑक्टोबर ला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.


 निर्माता,अभिनेते हरिओम घाडगे म्हणतात," मी स्वतः कोकणचा पुत्र असल्याने या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे कोकणातील आहे.  चित्रीकरणाची सुरुवातच तान्हाजी मालुसरे यांच्या उमरठ या गावातून झाली आहे. त्यामुळे अ‍ॅक्शनबरोबरच कोकणातील निसर्गसौंदर्यही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.  हा माझा पहिला मराठी चित्रपट असून नव्या पिढीला प्रेरित करणारा हा चित्रपट आहे. अनेक महिन्यांपासून 'हरिओम'च्या प्रदर्शनाची उत्सुकता होती अखेर आता 'हरिओम'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.  कोरोना काळात अनेक अडचणींवर मात करत हा चित्रपट बनवण्यात आला आहे.  महामारीच्या काळात अनेकांना रोजगार देण्याचे काम, काही सामाजिक उपक्रम या चित्रपटाच्या टीमच्या माध्यमातून राबवण्यात आले. आपण समाजाचे काही देणे लागलो, ही एकाच भावना यामागे होती. अथक प्रयत्नानंतर आता 'हरीओम' पूर्णत्वाला आला आहे. प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबियांसोबत हा चित्रपट नक्की पाहा.'


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 


Hariom : नवयुगातील मावळे; 'हरिओम' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला