एक्स्प्लोर
आमीर खानचा 'दंगल' फेसबुक अकाऊंटवरुन लीक
मुंबई : आमीर खानचा दंगल फेसबुकवर लीक झाला आहे. काल हाश्मी एएच नावाच्या अकाऊंटवरुन दंगल फेसबुकवर अपलोड करण्यात आला होता. पण फेसबुकला अनेकांनी याचा रिपोर्ट केल्यानं हाश्मीचं अकाऊंट ब्लॉक करण्यात आलंय.
काल आमीरचा दंगल हा सिनेमा एका पाकिस्तानी व्यक्तीनं फेसबुकवर शेअर केला. दंगलनं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी जवळपास 30 कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र फेसबुकवर शेअर होताच सुमारे 4 लाखांपेक्षाही जास्त लोकांनी तो पाहिला आहे.
दरम्यान हाश्मीनं फेसबुकवर दंगल शेअर करताना तो जास्तीत जास्त शेअर करावा अशी सूचनाही केली होती. त्यामुळे हे अकाऊंट नेमकं कुणाचं आहे, त्यानं कुठून सिनेमा घेतला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. पाकिस्तानमध्ये दंगल अजून रिलीज न झाल्यानं हा व्यक्ती दुबईचा नागरिक असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement