एक्स्प्लोर
उत्तर प्रदेशमध्ये आमीर खानचा 'दंगल' टॅक्स फ्री

लखनऊ : अभिनेता आमीर खानचा 'दंगल' सिनेमा उत्तर प्रदेशमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली आहे. देशभरात आज आमीरचा 'दंगल' सिनेमा रिलीज झाला आहे. 'दंगल' टॅक्स फ्री केल्यामुळे तिकीटाचे दर राज्यभर स्वस्त होतील. ज्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांना सिनेमा पाहता येईल. दरम्यान आमीरने नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातही कुस्तीसाठी 'दंगल' टॅक्स फ्री करावा, अशी मागणी केली होती. सिनेमा रिलीज झाल्याच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. समीक्षकांनीही सिनेमाला 4 स्टार रेटिंग दिलं आहे.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















