State Drama Competition : 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उद्यापासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 21 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत प्राथमिक फेरी रंगणार आहे. 


राज्यातील एकूण 19 शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. सांगली, सोलापूर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अहमदनगर, रत्नागिरी आणि पुणे. तसेच महाराष्ट्राबाहेर गोवा सेंटरमध्यदेखील ही स्पर्धा पार पडणार आहे. 


पुण्यातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात राज्यनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण 14 नाट्य संस्थांचा सहभाग आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री मा.श्री. अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेतील नाटकं पाहण्यासाठी शुल्क हे फक्त दहा रुपये ते 15 रुपये आहे. त्यामुळे आता सोमवारपासून नाट्यप्रेमींना नाटकांची मेजवानी मिळणार आहे. 


महाराष्ट्र सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला, दृक् कला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहे.


उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा, नाटय कलेचा प्रचार व प्रसार सर्वस्तरातून व्हावा, सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे हा उद्देश ठेऊन शासन राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन गेली 59 वर्ष करीत आहे. या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेने 60 व्या वर्षात पदार्पण केले आहे.  


संबंधित बातम्या


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Boss Mazi Ladachi : खडूस बॉसच्या भूमिकेसाठी भाग्यश्री लिमये नव्हे 'या' अभिनेत्रीला मिळाली होती ऑफर


Pawankhind : ‘पावनखिंड’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड, ‘हा’ विक्रम रचणारा पहिला मराठी चित्रपट!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha