Vikrant Massey : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सी (vikrant massey) आणि शीतल ठाकूर (sheetal thakur) यांचा विवाह सोहळा 14 फेब्रुवारी रोजी पार पडला. लग्न सोहळ्यासाठी विक्रांतनं ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि पेस्टल ग्रीन कलरची शेरवानी असा लूक केला होता. विक्रांत आणि शीतलनं नुकतेच त्यांच्या हळदीचे फोटो शेअर केले आहेत. 


विक्रांतनं हळदीचे फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'कुर्ता फाड हल्दी' तर शीतलनं फोटोला कॅप्शन दिले, 'हमारी हल्दी'. शीतलनं हळदीसाठी पिवळ्या रंगाचा लेहेंगा आणि फुलांची ज्वेलरी असा लूक केला आहे. तर विक्रांत हा पांढरी पँट आणि पांढरा टी शर्ट अशा लूकमध्ये दिसत आहे. 2015 पासून विक्रांत आणि शीतल एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता. कृती खरबंदा, तापसी पन्नू, मौनी रॉय, सोनाक्षी सिन्हा, बॉबी देओल, आहना कुमरा, ईशा गुप्ता आणि अनूप सोनी या कलाकारांनी  सोशल मीडियावरून विक्रांत आणि शीतलला शुभेच्छा दिल्या. 






 विक्रांत आणि शीतलनं एकता कपूरच्या ब्रोकन बट ब्लूटीफुल या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये एकत्र काम केलं आहे. ते दोघे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. 


संबंधित बातम्या


Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार रावकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत म्हणाला..


Sai Pallavi : 'कोट्यवधींचं मानधन असणारी जाहिरात नाकारली' ; चेहऱ्यावरील पिंपल्सबाबत साई पल्लवीनं सांगितला अनुभव


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha