Anup Soni : अनुप सोनी (Anup Soni) आज एक यशस्वी अभिनेता आहे. पण त्याचा अभिनयप्रवास सोपा नव्हता. मेहनतीच्या जोरावर, संघर्ष करत त्याने आज स्वत:ला सिद्ध केलं आहे. 'क्राइम पेट्रोल' (Crime Petrol) या सुपरहिट मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही.


हिरो बनण्याचं स्वप्न पाहत मायानगरीत आला अन्...


अनुप सोनीचं बालपण जयपूरमध्ये गेलं. जयपूरमध्ये असताना त्यांची ओळख सिनेमे आणि रंगभूमीसोबत झाली. सिनेसृष्टीतील ग्लॅमरने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. कॉलेजमध्ये असताना त्यांनी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. पुढे NSD मध्ये त्यांनी अभिनय प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर जयपूरला न जाता त्यांना मायानगरी मुंबईचा (Mumbai) मार्ग निवडला. 90 च्या दशकात हिरो होण्याचं स्वप्न पाहत मुंबईत आलेल्या अनुपला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.


अनुप सोनी स्वप्ननगरी मुंबईत आला तेव्हा तो फक्त 25 वर्षांचा होता. त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये हीरोची एक वेगळी परिभाषा होती. दिसायला सुंदर असणाऱ्यांनाच 'हीरो' म्हटले जात असे. पुढे सलमान खान (Salman Khan) आणि संजय दत्तमुळे (Sanjay Dutt) बॉडी बिल्डिंगची क्रेझ सुरू झाली. अनुप सोनी या कोणत्याच गटात फिट बसत नव्हता. त्यावेळी मोबाईल फोन घ्यायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते. 


इंडस्ट्रीतील प्रवासाबद्दल बोलताना अनुप सोनी म्हणाला,"इंडस्ट्रीमध्ये हीरो-हिरोइन आणि मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकारांना निर्माते किंवा दिग्दर्शक निवडत असे. तर इतर कलाकारांना कास्टिंग डिरेक्टर कास्ट करत असे. त्यामुळे चांगल्या कास्टिंग दिग्दर्शकांना भेटायला सुरुवात केली. तिथेच हा प्रवास थांबला नाही. मुंबईत धक्के मिळायला सुरुवात झाली. त्यामुळे मुंबई सोडण्याचा विचार मनात आला. त्यावेळी चांगलं जेवणदेखील मिळत नसे". 


अनुप सोनीला मुंबईत करावा लागलेला आर्थिक अडचणींचा सामना


अनुप म्हणाला,"दिल्लीतून मुंबईत येताना अनुप सोनी ठरावीक पैसे घेऊन आलो होतो. पैसे संपले तरी हाताशी काम नव्हतं. प्रत्येकवेळी घरच्यांकडून पैसे मागू शकत नव्हतो. त्यावेळी फोटोशूट करायलाही माझ्याकडे पैसे नव्हते. झोप उडवणारे दिवस कधी संपतात असं झालं होतं". 


'त्या' तीन ओळींनी बदललं आयुष्य


अनुपचे वाईट दिवस सुरू होते. त्यावेळी ओशो (Osho) यांचं एका प्रेरणा देणार पुस्तक वाचण्यात आलं. या पुस्तकातील तीन ओळींनी अनुपचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्या तीन ओळी होत्या,"आता तुम्ही ज्या ऐश्वर्यात जगत आहात, त्यापेक्षा अधिक चांगलं ऐश्वर्य तुम्हाला हवं असेल तर जुनं ऐश्वर्य सोडावं लागेल". ओशोच्या या तीन ओळी वाचल्यानंतर अनुपने पुन्हा एकदा सिनेसृष्टी एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली आणि अभिनयक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. 


लहान-मोठी कामे करत असताना अनुपची ओळख दिग्दर्शक अनुभव सिन्हासोबत झाली. त्यानंतर ऑडिशन दिल्यानंतर अनुपला मुंबईत त्याचं पहिलं काम मिळालं. त्यानंतर तीन-चार मालिकांमध्ये ते मुख्य भूमिकेत झळकले. अनेक कॉमेडी शोदेखील केले. पुढे 'गंगाजल', 'फिजा' सारख्या सिनेमांच्या माध्यमातून त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. पुढे 'क्राइम पेट्रोल' या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. पुढे दहा वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.


संबंधित बातम्या


Struggle Story : रेड लाईट एरियात गेलं बालपण, भीक मागून काढले दिवस; दिलीप कुमारांनी दिली सिनेमाची ऑफर अन् झाले बॉलिवूडचे सुपरस्टार; जाणून घ्या कादर खान यांची स्ट्रगल स्टोरी