प्रियांका चोप्रा भारतात कोविड-19शी लढा देणाऱ्या हेल्थ वर्कर्सना 10,000 जोडी पादत्राणं देणार आहे. तर याव्यतिरिक्त 10,000 जोडी पादत्राणं लॉस एन्जेलिसमध्येही डोनेट करणार आहे. प्रियांकाने क्रॉक्स कंपनीसोबत हात मिळवणी करत केरळ, महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकातील सार्वजनिक, तसेच शायकीय रूग्णालयांमध्ये हे शूज डोनेट करणार आहे.
प्रियांका चोप्रा-जोनासने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून याबात माहिती दिली. प्रियांका म्हणाली की, '20 हजार पैकी 10 हजार बूट ती लॉस एंजेलिस येथील वैद्यकिय कर्मचाऱ्यांना वाटणार आहे. तर उर्वरीत 10 हजार भारतातील सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार आहे. याशिवाय जगभरातील महिला वैद्यकिय कर्मचाऱ्यांसाठी तिने 76 लाख रुपयांचा निधीही जाहीर केला आहे.'
प्रियांका चोप्रा म्हणाली की, 'सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आलं असताना. त्याच्याशी दोन हात करणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी खरे सुपरहिरो आहेत. आपल्या सुरक्षेसाठी ते दररोज काम करत अलून आपल्यासाठीच लढा देत आहेत. त्यांच्या मदतीसाठी आपण देखील खारीचा वाटा उचलूया.'
दरम्यान, कोरोना सारख्या महाभयंकर आजाराविरूद्धच्या लढ्यात जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. या महामारीमध्ये प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता, लोकांची मदत करणाऱ्या लोकांचे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनास, शाहरूख खान यांच्यासह लेडी गागा आणि जगभरातील इतर सेलिब्रिटींनी आपल्या खास अंदाजात आभार मानले आहेत. लेडी गागाच्या 'वन वर्ल्ड : टुगेदर एट होम' या इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी जोडले गेले. या कॉन्सर्टमध्ये जगभरातील 70 हून अधिक कलाकार आणि सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
संबंधित बातम्या :
अनुष्का शर्माचा डिजीटल डेब्यू; रिलीज केला आपल्या अनटायटल्ड सीरिजचा टीझर
#LockdownOnDomesticViolence | घरगुती हिंसेविरोधात आवाज उठवण्याचं बॉलिवूडकरांचं चाहत्यांना आवाहन
Coronavirus | सात महिन्यांच्या चिमुकल्याने कोरोनाला दिली मात; अभिनेत्री शिखा मल्होत्राने शेअर केला फोटो
COVID-19 | प्रियांका चोप्रापासून लेडी गागापर्यंत जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी 'कोरोना वॉरियर्स'चे मानले आभार