मुंबई : सध्या देश कोरोना व्हायरसच्या संकटाशी लढा देत आहे. अशातच सामान्य माणसापासून बॉलिवूड स्टार्सपर्यंत सर्वजण या लढ्यात सहभागी झाले आहेत. अशातच संजय मिश्रासोबत 'कांचली' या चित्रपटात दिसून आलेली अभिनेत्री शिखा मल्होत्रा सध्या नर्सचं काम करत असून मुंबईतील रूग्णालयात ती कोरोना बाधितांची सेवा करत आहे. याचा फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. त्याचबरोबर तिने हेदेखील सांगितलं आहे की, '7 महिन्यांच्या कोरोना बाधित मोहम्मदने कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे.



अभिनेत्री शिखा मल्होत्राने कोरोना विरोधातील लढाई जिंकणाऱ्या बाळासोबतचा फोटोही शेअर केला आहे. यावेळी तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, '7 महिन्यांच्या कोरोना बाधित मोहम्मदने कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकली आहे. त्याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जेव्हा त्या कुटुंबियांनी मला नर्सच्या पोशाखाशिवाय पाहिलं त्यावेळी मला ओळखलं नाही. परंतु, जेव्हा मी त्या सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या ज्या मी त्यांना वॉर्डमध्ये सांगत होती. त्यावेळी ते बाळ माझ्याकडे आलं आणि मी त्याच्यासोबत सेल्फी घेतला. ज्याप्रकारे त्याने मला मिठी मारली, मी त्यावेळच्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. जय हिंद.' फोटोमध्ये शिखासोबतच बाळाचं कुटुंबही दिसत आहे.


अभिनेत्री शिखा मल्होत्राने दिल्लीच्या सफदकजंग हॉस्पिटलमधून BSC नर्सिंगमध्ये डिग्री घेतली आहे. कोरोनासारखं संकट देशावर आलं आहे, त्यामुळे संकटाच्या काळात शिखा देशाची सेवा करत आहे. तिने उचललेल्या या पावलामुळे सोशल मीडियावर तिचं फार कौतुक होत आहे.


#LockdownOnDomesticViolence | घरगुती हिंसेविरोधात आवाज उठवण्याचं बॉलिवूडकरांचं चाहत्यांना आवाहन


दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ज्यामुळे देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. भारतामध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या 19 हजार पार पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 603 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 3259 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


संबंधित बातम्या : 


coronavirus | कोरोनाच्या जनजागृतीसाठी सलमानचे 'प्यार करोना' गाणे रिलीज


COVID-19 | प्रियांका चोप्रापासून लेडी गागापर्यंत जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी 'कोरोना वॉरियर्स'चे मानले आभार


आता माझी सटकली...! जेव्हा अजय देवगणला डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांचा राग येतो..