एक्स्प्लोर

89 नव्हे, एकच कट, 'उडता पंजाब'ला हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : 'उडता पंजाब' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. तीन डिस्क्लेमर देत फक्त एका कटसह चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला 89 कट्स सुचवले होते.   48 तासांच्या आत उडता पंजाब चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र देण्याचे आदेश हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याच्या एका सीनला कात्री लावण्यास कोर्टाने सांगितलं आहे.   सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी)च्या नियामांनुसार छायाचित्रणाच्या अधिनियमात सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले कट्स कुठेही बसत नाहीत. त्यामुळे चित्रपट सेन्सॉर करण्याचा बोर्डाला कोणताही अधिकार नाही. सीबीएफसीने केलेल्या दाव्यानुसार पंजाबची प्रतिमा मलिन करणारी किंवा भारताच्या अखंडतेत बाधा आणणारी कुठलीच गोष्ट चित्रपटात आढळत नाही, असंही हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे.   'सृजनात्मक स्वातंत्र्यावर अनावश्यक निर्बंध लादता कामा नयेत. कोणत्याही दिग्दर्शकाला त्याच्या चित्रपटातील आशयावर आदेश देऊ शकता येत नाहीत. एखादा सीन कापण्यास किंवा हटवण्यास किंवा बदलण्यास सुचवण्याचे सीबीएफसीचे अधिकार संविधानाला धरुन असावेत.' असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.   चित्रपट चांगला किंवा वाईट हे ठरवण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहे, सेन्सॉर बोर्डाने फक्त प्रमाणपत्र देण्याचं काम करावं, अशा शब्दात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कार्टाने सेन्सॉर बोर्डाला सुनावलं होतं. सिनेमाचे निर्माते अनुराग कश्यप यांनी सेन्सॉर बोर्डाविरोधात कोर्टात धाव घेतली होती.   उडता पंजाब हा चित्रपट 17 जूनला प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर, आलिया भट, करिना कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

संबंधित बातम्याः 

 

'उडता पंजाब'ला सेन्सॉरकडून 'ए' सर्टिफिकेट, आज हायकोर्टात सुनावणी

तुम्ही फक्त प्रमाणपत्रं द्या, निवडीचा अधिकार प्रेक्षकांना : हायकोर्ट

'उडता पंजाब' वाद: मुंबई हायकोर्टात आज काय झालं?

महत्त्वाच्या बातम्या

Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget