City Of Dreams Season 3 Promo Out : 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या (City Of Dreams 3) तिसऱ्या सीझनची सध्या सर्वत्र चर्चा आहे. लवकरच ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या सीरिजच्या नव्या प्रोमोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोतील डॉयलॉग प्रेक्षकांना थक्क करणारा आहे. 


'सिटी ऑफ ड्रीम्स 3'च्या नव्या प्रोमोमध्ये काय आहे? (City Of Dreams Season 3) 


'सिटी ऑफ ड्रीम्स 3'च्या नव्या प्रोमोमध्ये सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) एक डॉयलॉग बोलताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत,"साहेबांच्या निवृत्तीचा काही भरवसा नाही. राजकारणात प्रत्येकाला स्वत:चा विचार करावाच लागतो. पक्ष व साहेब दोघांचीही मी खूप सेवा केली. पण साहेब त्यांच्या मुलीकडेच सत्ता देणार. इमानदारी फक्त कुत्र्यांनीच करावी. राजकारणात कोणीही कोणाचे पाय दाबण्यासाठी नाही तर सत्तेसाठी येतात. मग यासाठी तुम्हाला कोणाचे पाय दाबावे लागू दे अथवा गळा". 






'सिटी ऑफ ड्रीम्स' या बहुचर्चित सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकारण व सत्तासंघर्षावर आधारित असलेल्या या वेब सीरिजचे दोनही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरनेही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. 


'सिटी ऑफ ड्रीम्स 3' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (City Of Dreams Season 3 Release Date)


'सिटी ऑफ ड्रीम्स 3' 26 मेपासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या सीझनचा जिथे शेवट होतो तिथूनच तिसऱ्या सीझनची सुरुवात होणार आहे. या सीझनमध्ये अमेयराव गायकवाड पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. अमेयराव गायकवाडचा अनोखा अंदाज या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. 


तगडी स्टारकास्ट असलेली 'सिटी ऑफ ड्रीम्स 3'


नागेश कुकुनूर दिग्दर्शित 'सिटी ऑफ ड्रीम्स 3' या सीरिजमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni), प्रिया बापट (Priya Bapat) आणि सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) मुख्य भूमिकेत आहेत. एकंदरीतच तगडी स्टारकास्ट असलेल्या या सीरिजची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.  


संबंधित बातम्या