Salman Khan New Photo : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. दोन दिवसांपूर्वी त्याने 'टायगर 3'च्या (Tiger 3) शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. अशातच आता भाईजानने आणखी एक फोटो शेअर केला आहे. त्याचा नवा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. 


सलमानने (Salman Khan) सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो खूपच हॅंडसम दिसत आहे. निळ्या रंगाचं टी-शर्ट, जॉगर्स आणि टोपी असा सलमानचा लूक आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोत तो समुद्रातील एका बोटीवर उभा असलेला दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"बोट हो गया". 






टायगर इज बॅक!


सलमान खानचा नवा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते कमेंट्स करत सलमानचं कौतुक करत आहेत. 'एक नंबर भाईजान', 'उफ्फ... मला तू खूप आवडतोस सलमान', 'टायगर इज बॅक', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


'टायगर 3'च्या सेटवर सलमान खानला दुखापत


सलमानने याआधीदेखील 'टायगर 3' सेटवरील एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सलमानने दुखापत झालेली दिसून येत होतं. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं होतं की,"जेव्हा तुम्हाला वाटतं की संपूर्ण जगाचा भार तुमच्या खांद्यावर आहे त्यावेळी जगाला सोडा आणि पाच किलोच्या डंबलचे वजन उचलून दाखवा... टायगर जखमी आहे". 


'टायगर 3'मध्ये भाईजानसोबत झळकणार 'हे' कलाकार


सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाशमीदेखील झळकणार आहे. तसेच या सिनेमात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) झलक दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. सलमानच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 


संबंधित बातम्या


Salman Khan : सलमान खानला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; फोटो शेअर करत म्हणाला,"टायगर जखमी आहे"