CHYD : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला  पसंती मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर या आठवड्यात प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 


सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमध्ये अनेक कलाकारांची देखील लग्न झाली. तर काही कलाकारांचा साखरपुडादेखील झाला. या सगळ्यात चर्चेत होते ते म्हणजे विराजास कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे आणि प्रेक्षकांचा लाडका राणादा आणि पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. हे दोन्ही सेलेब्रिटी कपल या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर हजेरी लावणार आहेत. 


सेलिब्रिटी कपलच्या उपस्थित 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील विनोदवीरांनी मात्र चांगलाच कल्ला केला आहे. विराजास, शिवानी, हार्दिक आणि अक्षया सोबत अंशुमन विचारे त्यांच्या सौ आणि त्यांची चिमुकली देखील हजर असणार आहेत. या विशेष भागात 'चला हवा येऊ द्या'च्या विनोदवीरांनी राजा हिंदुस्तानी सिनेमावर स्किट सादर केलं. यात भाऊ अमीर खान झाला होता. तर श्रेया बुगडे करिष्मा कपूरच्या भूमिकेत होती. 


'कसं काय मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे.. असं म्हणत  'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 'चला हवा येऊ द्या'मधील थुकरटवाडी, यातील श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि निलेश साबळे गेली अनेक वर्षे प्रेक्षकांना त्यांच्या विनोदांनी हसवत आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. 


'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी-हिंदी सिनेमांना, मालिकांना तसेच कलाकारांना प्रमोशनसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. निलेश साबळेचे खुशखुशीत अॅंकरिंग, भाऊ आणि कुशलची हास्याची जुगलबंदी, भारत गणेशपुरेंनी साकारलेले सरपंच, पोस्टमन काकांच्या रुपात भेटलेला सागर कारंडे प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. तर श्रेया बुगडे प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहते. 


संबंधित बातम्या


Udayanraje : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात उदयनराजेंची फिल्मी स्टाईल एन्ट्री


'चला हवा येऊ द्या' वादाच्या भोवऱ्यात; डोक्यात हवा गेल्याचा संभाजीराजे छत्रपती यांचा आरोप