Chrisann Pereira: सडक-2 चित्रपटातील अभिनेत्री  क्रिसॅन  परेरा ही (Chrisann Pereira) गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. क्रिसॅनला ड्रग्ज प्रकरणी शारजाह तुरुंगात ठेवण्यात आले होते.  बुधवारी  तुरुंगातून  सुटल्यानंतर क्रिसॅननं शारजाहमधील तिच्या तुरुंगातील आठवण एका पात्रामध्ये लिहिल्या आहेत. क्रिसॅननं लिहिलेलं हे पत्र एबीपी माझाकडे  आहे.  क्रिसॅनच्या भावाने या पत्राचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 


पत्रात क्रिसननं लिहिलं, "प्रिय योद्धा, तुरुंगात पेन आणि कागद शोधण्यासाठी मला तीन आठवडे आणि पाच दिवस लागले.  मी डिटर्जंटने माझे केस धुतले आणि टॉयलेटच्या पाण्याचा वापर करून कॉफी बनवली.  माझ्या महत्वाकांक्षेने मला येथे आणले असा विचार मी कधीकधी करायचे, त्यामुळे  माझ्या डोळ्यात अश्रू आले.  मला कधीकधी आपले चित्रपट आणि टीव्हीवरील ओळखीचे चेहरे पाहून हसू येते.  मला भारतीय असल्याचा आणि भारतीय चित्रपट उद्योगाशी संबंधित असल्याचा मला अभिमान वाटतो,” 






पत्राद्वारे क्रिसॅननं तिच्या कुटुंबाचे, मित्रांचे, पोलिसांचे आभार मानले. तिनं पत्रात लिहिलं,  “तुम्हीच खरे योद्धा आहात,   या ‘मॉनस्टर्स’नं खेळलेल्या या घाणेरड्या खेळात मी फक्त एक प्यादा आहे.  खऱ्या गुन्हेगारांना अटक करणाऱ्यांचे मी आभार मानते. तसेच माझी कथा शेअर करणाऱ्या प्रत्येकाची मी कायम ऋणी आहे. '


“माझे आणि या प्रकरणात अडकेलेल्या इतर निष्पाप लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल धन्यवाद.  न्याय नेहमीच विजयी होवो,” असंही या पत्रात क्रिसॅननं लिहिलं आहे.


भूलथापा देऊन शारजाला पाठवून सोबत अमली पदार्थ देऊन क्रिसॅन परेरालाला अडकवल्याचा आरोप अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे यांच्यावर करण्यात आला  आहे. पूर्व वैमनस्यातून क्रिसॅन आणि डी जे क्लेटन रॉड्रिग्जला अडकवल्याचा संशय आहे.  पोलीस या प्रकरणाचा पुढे तपास करत आहेत. मुंबई गुन्हे शाखेने  क्रिसॅनला ड्रग प्रकरणात अडकवणाऱ्या आरोपी अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे उर्फ रवी यांना अटक केलं असून ते 2 मे पोलीस कोठडीत आहेत. 


क्रिसॅन परेरा हिनं काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सडक-2 या चित्रपटासोबतच तिनं बाटला हाऊस या चित्रपटात देखील काम केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chrisann Pereira: क्रिसॅन परेराची तुरुंगातून सुटका; अभिनेत्रीच्या भावानं पोस्ट शेअर करत दिली माहिती