Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईमध्ये पार पडलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्कार सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीबाबत सांगितलं. लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर या पुरस्कार सोहळ्यात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला की, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या चित्रपटाची निर्मीती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावी, अशी तुमची इच्छा आहे, त्या चित्रपटाचं दिग्दर्शन करावं, अशीही तुमची इच्छा आहे. या चित्रपटाचं काम कधी सुरु होणार?' अमोल कोल्हे यांच्या या प्रश्नाला राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
काय म्हणाले राज ठाकरे?
'छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या चित्रपटाचं काम कधी सुरु होणार?, असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी विचारल्यानंतर राज ठाकरे यांनी उत्तर दिलं, 'चित्रपटाचं काम सुरु झालं आहे. चित्रपटाच्या लिखाणाचं काम देखील सुरु झालं आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये येईल. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा असेल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचीच लोकं या चित्रपटात काम करतील.'
अमोल कोल्हे यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते राज ठाकरे यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत.
लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर या पुरस्कार सोहळ्यात राज ठकरे यांनी मराठी चित्रपटसृष्टी, महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण या सर्व विषयांवर चर्चा केली.
अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधरित पोस्ट शेअर करत असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर 840K एवढे फॉलोवर्स आहेत. त्यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा अमोल कोल्हेंचा (Amol Kolhe) शिवप्रताप गरुडझेप (Shivpratap Garudjhep) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.
इतर महत्वाच्या बातम्या: