Chitrashi Rawat Wedding: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'चक दे इंडिया' (Chak De India)  हा चित्रपट 2007 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट रिलीज होऊन 15 वर्ष झाली आहेत. तरी देखील आनेक लोक आजही तो चित्रपट आवडीनं बघतात. या चित्रपटांमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटात 'कोमल चौटाला' ही भूमिका साकारणाऱ्या चित्राशी रावतचा  (Chitrashi Rawat Wedding) विवाह सोहळा पार पडला आहे. चित्राशीनं ध्रुवादित्य भगनानीसोबत (Dhruvaditya Bhagwanani) लग्नगाठ बांधली. गेली काही वर्ष चित्राशी  ध्रुवादित्यला डेट करत होती. आता या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  


कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत चित्राशी आणि ध्रुवादित्यचा विवाह सोहळा पार पडला. चित्राशीच्या विवाह सोहळ्याला 'चक दे इंडिया' चित्रपटातील स्टार कास्टनं हजेरी लावली. अभिनेत्री विद्या मालवाडेनं चित्राशीच्या विवाह सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. विद्या मालवाडेनं 'चक दे इंडिया' या चित्रपटात गोलकीपर विद्या शर्मा ही भूमिका साकारली. विद्याबरोबरच शुभी मेहता, सीमा आजमी आणि शिल्पा शुक्ला यांनी देखील चित्राशी आणि ध्रुवादित्यच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.


विद्या मालवाडेनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये चित्राशी ही सोनेरी डिझाइन असलेला पिवळ्या रंगाचा घागरा, गोल्डन ज्वेलरी आणि लाल ओढणी अशा ब्रायडल लूकमध्ये दिसत आहे. 


पाहा फोटो: 






चित्राशी ही गेली 11 वर्ष  ध्रुवादित्यला डेट करत होती. चित्राशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 219K फॉलोअर्स आहेत. चित्राशीच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिनं 'चक दे इंडिया' व्यतिरिक्त ​​'फॅशन', 'तेरे नाल लव्ह हो गया', 'लक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :  


15 Years Of Chak De India : 'चक दे इंडिया'ची 15 वर्ष; 'या' अभिनेत्यांनी नाकारली होती ऑफर, तीच भूमिका साकारुन शाहरुखनं पटकावले सात फिल्मफेयर