Chitrashi Rawat Wedding: 'चक दे गर्ल' फेम चित्राशी रावतचा नववधू साज; लग्नाच्या फोटोंमध्ये दिसतेय खास
Chitrashi Rawat Wedding Photos: 'चक दे' फेम अभिनेत्री चित्राशी रावत (Chitrashi Rawat) हिनं तिचा प्रियकर ध्रुवदित्यसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. चित्राशीच्या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2007 मध्ये शाहरुखच्या 'चक दे इंडिया' चित्रपटात चित्राशीनं कोमल चौटालाची भूमिका साकारली होती. या भूमिकेनं चित्राशीला वेगळी ओळख दिली होती.
11 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर चित्राशीनं बॉयफ्रेंड ध्रुवदित्यसोबत लग्नगाठ बांधली आहे.
'चक दे इंडिया' चित्रपटानंतर एफआयआर सीरियलमध्ये साकरलेली इन्स्पेक्टर ज्वालामुखी चौटालाची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती.
चित्राशीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला लग्न साधेपणानं करायचं होतं. डेहराडूनमध्ये कोर्ट मॅरेज करण्याची त्यांची इच्छा होती, मात्र घरच्यांच्या आग्रहामुळे चित्राशी आणि ध्रुवदित्यच्या लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. 5
लग्नावर खर्च करण्यापेक्षा त्या पैशातून तिला संपूर्ण जग फिरायचं होतं, असं चित्राशीनं मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं, असंही चित्राशीनं मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं.
चित्राशीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नववधू साज केलेली चित्राशी खूपच सुंदर दिसतेय.
चित्राशी आणि ध्रुवदित्यच्या लग्नसोहळ्यात कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र सहभागी झाले होते.
चित्राशीच्य लव्ह स्टोरीबाबत बोलायचं तर चित्राशी आणि ध्रुवदित्य यांची पहिली भेट 'प्रेमामयी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात तो तिच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात काम करताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
चित्राशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 219K फॉलोअर्स आहेत. ती 'चक दे इंडिया' व्यतिरिक्त 'चित्राशी रावत को फॅशन', 'तेरे नाल लव हो गया' यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली होती.